धाराशिवमध्ये नुकतीच जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी महायुतीकडून पालकमंत्र्यांचं स्वागत केले. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खुणावत आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत ओमराजे निंबाळकर महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केले. त्यानंतर धाराशिवमधून ठाकरेंना धक्का बसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
advertisement
कैलास पाटलांनी मौन सोडले....
आमदार कैलास पाटील हे देखील निवडणूक निकालानंतर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली होती. या चर्चांवर कैलास पाटलांनी यावर मौन सोडत स्पष्टच भाष्य केले. कैलास पाटील यांनी म्हटले की, सत्ता गेली म्हणजे आम्ही पक्ष सोडणार नाही. आम्ही संघर्ष करू अन् पक्ष वाढवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. कैलास पाटलांनी पुढे म्हटले की, ठाकरे गटात कुठेही अस्वस्थता नाही. आम्ही कालही ठाकरेंसोबत होतो आणि उद्याही ठाकरेंसोबत असू असं कैलास पाटील यांनी स्पष्ट केले. खासदार ओमराजे निंबाळकर आणि मी दोघेही ठाकरेंसोबतच आहोत असे त्यांनी स्पष्ट केले.
सरनाईकांनी काय म्हटले होते?
धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक दाखल झाले होते. या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे यांनी महायुतीकडून पालकमंत्र्यांचं स्वागत केले. यावेळी प्रताप सरनाईक यांनी आमदार कैलास पाटील यांना खुणावत आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे बोट दाखवत ओमराजे निंबाळकर महायुतीचेच असल्याचं वक्तव्य केले. सरनाईक यांनी म्हटले की, येत्या काळात धाराशिवमध्ये एखादा राजकीय भूकंप आला, तर काही वावगं ठरणार नाही, अशा आशयाचे वक्तव्य केले. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते.