जाणून घ्या परिक्षेच्या तारखा
वेळापत्रकानुसार महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 5 ते 9 मे 2026 दरम्यान होणार आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आणि कृषी सेवा मुख्य परीक्षा 16 मे 2026 रोजी होईल. या परीक्षांचे निकाल ऑगस्ट 2026 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.तर महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 17 मे 2026 रोजी होणार असून, याचा निकाल सप्टेंबर 2026 मध्ये येईल. तसेच, गट-क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा 7 जून 2026 रोजी होईल त्याचे निकालही सप्टेंबर 2026 मध्ये अपेक्षित आहेत.
advertisement
राज्यसेवा पूर्व परीक्षा 31 मे 2026 रोजी आयोजित केली जाईल. राज्यसेवा मुख्य परीक्षा 3 ते 24 ऑक्टोबर 2026 या कालावधीत होणार आहे. यानंतर, विद्युत आणि यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा, कृषी सेवा तसेच स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 15 नोव्हेंबर 2026 रोजी होणार आहेत. अन्न आणि औषध प्रशासन सेवा आणि निरीक्षक (वैधमापन शास्त्र) मुख्य परीक्षा 21 नोव्हेंबर 2026 रोजी घेतली जातील.
महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा डिसेंबर 26 ते 30,2026 दरम्यान होणार आहे, ज्याचे निकाल एप्रिल 2027 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या परीक्षांचे वेळापत्रक वेगळे जाहीर केले जाणार आहे.
एकंदरीत पाहता MPSC 2026 मध्ये अनेक महत्त्वाच्या सेवा परीक्षा होणार असून उमेदवारांनी आपले तयारीचे वेळापत्रक त्यानुसार आखणे गरजेचे आहे. परीक्षांचे निश्चित तारखा आणि निकालांची माहिती अधिकृत MPSC संकेतस्थळावर तपासता येईल.