TRENDING:

Mumbai : कोणता झेंडा घेऊ हाती? माहिम आणि अनुशक्तीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची कोंडी

Last Updated:

Mumbai : भाजपने माहिममध्ये महायुतीच्या उमेदवाराविरोधात अमित ठाकरेंना पाठिंब्याची भूमिका घेतलीय. तर नवाब मलिक यांच्या मुलीच्या प्रचारात भाजपचे झेंडे वापरू नये असे आदेश देण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रणाली कापसे, प्रतिनिधी
Maharashtra bjp
Maharashtra bjp
advertisement

मुंबई : महायुतीत मुंबईत माहिम आणि अनुशक्तीनगर या मतदारसंघात पेच निर्माण झाला आहे. माहिममध्ये भाजपने मनसेच्या अमित ठाकरेंना पाठिंबा दिलाय. तर अनुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक यांच्या मुलीला राष्ट्रवादीने तिकीट दिल्यानं भाजप नाराज आहे. या दोन मतदारसंघात भाजपच्या कार्यकर्त्यांची मात्र पुरती कोंडी झालीय. माहिममध्ये मनसेला पाठिंब्याबाबत देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांनी कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना सांगितलंय. तरी पदाधिकारी मात्र शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांचा प्रचार करत आहेत.

advertisement

अनुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक यांची कन्या सना मलिक यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देण्यात आलीय. महायुतीच्या उमेदवार असूनही सना मलिक यांच्या प्रचारात भाजपचा एकही झेंडा दिसत नाहीय. सना मलिक यांच्या प्रचारात सहभागी होताना भाजपचे झेंडे हातात न घेण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अनुशक्तीनगरच्या उलट चित्र माहिममध्ये दिसून येत आहे. महायुतीकडून या मतदारसंघात सदा सरवणकर यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला आहे. पण भाजपचे वरिष्ठ नेते मात्र या मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरेंना पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेत आहेत. नेत्यांकडून अमित ठाकरेंना पाठिंबा जाहीर झाला असला तरी पदाधिकारी मात्र महायुतीचे उमेदवार सदा सरवणकर यांचं समर्थन करताना दिसत आहेत.

advertisement

अनुशक्तीनगरमध्ये अजितदादा गट विरुद्ध पवार गट

अनुशक्ती नगर मतदारसंघाची लढत आता अनपेक्षितपणे लक्षवेधी ठरणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक यांचा हा मतदारसंघ. मलिक सध्या अजित पवार यांच्या गटात गेले आहेत. पण महायुतीची उमेदवारी त्यांना मिळू नये याबाबत भाजप ठाम असल्याने त्यांच्याऐवजी मुलगी सना मलिक यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे.

दुसरीकडे शरदचंद्र पवार गटाने या मतदारसंघात कुरघोडी करत फहाद अहमद या युवा नेत्याला उमेदवारी दिली आहे. फहाद यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश झाला आणि त्यांना अणुशक्ती नगरमधून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करण्यात आलं.  फहाद अहमद हे अभिनेत्री स्वरा भास्करचे पती आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai : कोणता झेंडा घेऊ हाती? माहिम आणि अनुशक्तीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांची कोंडी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल