मनीषा चौधरी या 'दीपिका फाउंडेशन'च्या अध्यक्ष आहेत. त्या गेल्या पाच वर्षापासून संभाजीनगरमध्ये झाडांच्या कुंडीतील मातीचा गणपती तयार करण्याचं प्रशिक्षण देतात. यासाठी त्या अनेक कार्यशाळा घेतात. संभाजीनगरमधील अनेक शाळांमध्ये जाऊन त्यांनी शाळकरी मुलांना देखील प्रशिक्षण दिलं आहे. बाप्पाची मूर्ती तयार करण्यासाठी कुंडीतील माती कशी तयार करायची, त्यापासून मूर्तीला कसा आकार द्यायचा आणि तयार झालेली मूर्ती सुशोभित कशी करायची, अशा विविध गोष्टी मुलांना शिकवल्या जातात.
advertisement
Ganeshotsav 2025: 106 वर्षांची मंडळाची परंपरा, पुण्यात यंदा साकारली 22 फूट उंच गणेश मूर्ती, Video
मनीषा चौधरी यांनी आतापर्यंत 5000 पेक्षाही जास्त मुलांना गणपती बनवण्याचं प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यांचा या उपक्रमाला शासनाच्या आणि खासगी शाळांनी देखील चांगला प्रतिसाद दिला आहे. मनीषा म्हणाल्या, "शाडूच्या मातीपेक्षा आपल्या घरी असलेल्या झाडांच्या कुंडीतील माती अतिशय चांगली असते. तिचा आपण वापर केला तर अतिशय सुंदर गणपती बाप्पा तयार होतो. या बाप्पाचं विसर्जन तुम्ही घरीच करू शकता आणि तीच माती पुन्हा कुंडीमध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने गणेशोत्सव एकदम पर्यावरण पूरक होतो."





