Ganeshotsav 2025: 106 वर्षांची मंडळाची परंपरा, पुण्यात यंदा साकारली 22 फूट उंच गणेश मूर्ती, Video

Last Updated:

मुंबईतील भव्य गणेश मूर्तींचे आकर्षण सर्वांनाच आहे, मात्र आता पुणेकरांनाही त्याचा अनुभव आपल्या शहरात घेता येणार आहे.

+
गणपती 

गणपती 

पुणे : मुंबईतील भव्य गणेश मूर्तींचे आकर्षण सर्वांनाच आहे, मात्र आता पुणेकरांनाही त्याचा अनुभव आपल्या शहरात घेता येणार आहे. गणेशोत्सवाच्या पारंपरिक देखाव्यांत पुण्यातील गणेश पेठ येथील कस्तुरे चौक तरुण मंडळाने एक अनोखी संकल्पना साकारली आहे. मंडळाने 22 फूट उंच बॅलेंसिंग गणेश मूर्ती साकारली असून ती मूषक रथावर विराजमान आहे. यामुळे पुणेकरांना मुंबईच्या भव्यतेची झलक आपल्या शहरातच पाहायला मिळणार असून, हा देखावा गणेशोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
कस्तुरे चौक तरुण मंडळ हे पुण्यातील एक जुनं आणि प्रतिष्ठित मंडळ असून, यंदा मंडळ आपलं 106 वं वर्ष साजरा करत आहे. पूर्वी येथे विद्युत रोषणाई आणि आकर्षक स्थिर देखावे असायचे. मात्र मागील वर्षापासून मंडळाने एक नवा उपक्रम सुरू केला. बॅलेंसिंग गणेश मूर्ती. या उपक्रमाची सुरुवात गेल्या वर्षी झाली होती आणि यंदा दुसऱ्या वर्षी मंडळाने अधिक भव्य स्वरूपात ही परंपरा पुढे नेली आहे.
advertisement
मुंबईत जशी गणपती आगमनाची धूम असते, तशीच धूम यंदा पुण्यातही पाहायला मिळाली. कस्तुरे मंडळाने मुंबईच्या परंपरेनुसार भव्य आगमन सोहळा आयोजित केला. मात्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना मात्र नेहमीप्रमाणे गणेश चतुर्थीच्या दिवशीच करण्यात येणार आहे. आगमन सोहळ्यात पारंपरिक मिरवणुकीसह ढोल-ताशांचा गजर, लेझीम पथक आणि शेकडो गणेशभक्त सहभागी झाले.
advertisement
या मूर्तीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिचं 22 फूट उंच बॅलेंसिंग स्वरूप. मूर्ती एका पायावर उभी आहे आणि खाली भव्य मूषक रथ आहे. इतक्या उंच मूर्तीला संतुलन देणं हे अत्यंत कौशल्याचं काम असून, हे काम मूर्तिकार राजू शिंदे (लालबाग, परळ, मुंबई) यांनी केलं आहे. मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्ते ओंकार सट्टे यांनी सांगितलं की, ही मूर्ती फक्त 15 दिवसांत साकारण्यात आली आहे.
advertisement
गणेशोत्सवात दरवर्षी काहीतरी नवीन पाहण्याची उत्सुकता असते. मुंबईतील लालबागच्या गणपतीसारख्या भव्य मूर्ती पाहायला अनेकांना मुंबईला जाणं शक्य नसतं. ही बाब लक्षात घेऊन मंडळाने पुण्यातच असं काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच पुणेकरांना यंदा घरबसल्या मुंबईच्या परंपरेची झलक अनुभवता येत आहे.
जरी मूर्तीचे स्वरूप भव्य आणि नावीन्यपूर्ण असले तरी पारंपरिकतेकडेही मंडळाने विशेष लक्ष दिलं आहे. प्राणप्रतिष्ठापना, पूजाविधी हे सगळं पारंपरिक पद्धतीनेच होत आहे. मंडळाच्या 106 वर्षांच्या प्रवासात हा बदल नक्कीच महत्त्वाचा टप्पा ठरतो आहे.
advertisement
पुण्यातील गणेशभक्तांसाठी ही मूर्ती मोठं आकर्षण ठरणार असून, यंदाचा गणेशोत्सव कस्तुरे चौकाच्या या ‘ब्रह्मांड भ्रमण मूषक रथावरील बॅलेंसिंग बाप्पा’ पाहिला मिळणार आहे.
view comments
मराठी बातम्या/अध्यात्म/
Ganeshotsav 2025: 106 वर्षांची मंडळाची परंपरा, पुण्यात यंदा साकारली 22 फूट उंच गणेश मूर्ती, Video
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement