पोपटी बनवण्याची पारंपरिक पद्धत (Non-Veg Popti)
साहित्य-
मांसाहार: चिकन किंवा मटण.
भाज्या: वालाच्या शेंगा (घेवडा), बटाटे, कांदा.
अंडी: अख्खी अंडी किंवा अंड्यांचे काप.
पाने: भांबुर्ड्याची /केळीची पाने (यामुळे खास वास येते).
मसाला: कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची, हळद, लिंबू, मीठ,
इतर: ओवा (घट्टपणासाठी).
कृती-
मसाला तयार करणे: कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरची, हळद, मीठ, लिंबू, दही यांची पेस्ट बनवा. यात चिकन/मटण मॅरीनेट करा.
advertisement
थर लावणे: मातीच्या मडक्याला किंवा मोठ्या पत्र्याच्या डब्याला भांबुर्ड्याची पाने लावून घ्या.
भरणे: पानांवर मसाल्यात घोळलेले चिकन/मटण, शेंगा, बटाटे, कांदा आणि अंडी यांचे थर द्या.
बंद करणे: वरून अजून पाने आणि थोडे मिश्रण घालून घट्ट बंद करा, जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही.
शिजवणे: हे मडकं किंवा डबा कोळशाच्या शेगडीवर किंवा मंद आचेवर गॅसवर ठेवून शिजवा, जेणेकरून सर्व चवी आत मुरतील.
खाणे: ही पोपटी थेट मडक्यात किंवा डब्यातून गरमागरम खाल्ली जाते.
मित्र-मैत्रिणी किंवा सर्व कुटुंब एकत्र येऊन गावाकडचा स्टार्टर मेनू म्हणून आनंदात खातात.तुम्ही ही पोपटी थर्टी फर्स्ट ला सर्वजण एकत्र येऊन नक्कीच बनू शकता