मालेगाव ३ वर्षांच्या चिमुरडी अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विजय खैरनारला आज मालेगावच्या अप्पर जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार होतं. पण आरोपीला कोर्टात हजर करण्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आरोपीला न्यायालयात हजर करावं लागलं. यावेळी न्यायालयात काय घडलं, याबद्दलची माहिती सरकारी वकील संजय सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
advertisement
चिमुरडीची हत्या करताना आरोपीने हत्यार वापरले
आरोपीने चिमुरडीचा खून एका हत्याराने केला आहे. मागील चार दिवसांच्या कोठडीमध्ये आरोपीने ते हत्यार काढून दिलं नाही. चौकशी दरम्यान त्याने कोणतंही सहकार्य केलं नाही. म्हणून रिकव्हरीचं ग्राऊंड होता. पीडित मुलीचं अपहरण करण्यामध्ये कुणी त्याला मदत केली, आणखी कुणी सहकार्य केलंय का? हे प्रश्न अजून अनुत्तरीत आहे, पोलिसांनी या प्रश्नाची उकल करण्यासाठी आरोपीची कोठडी मागितली होती, अशी माहिती सोनवणेंनी दिली. तसंच वैद्यकीय तपास अधिकाऱ्यांना या प्रकरणात तपास करायचा आहे. या घटनेत कुणी प्रत्यक्षदर्शी आहे, त्यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे आरोपीला २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
...म्हणून आरोपीला कोर्टात आणलं नाही
आज कोर्टामध्ये आरोपीला सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली होती. आरोपीला न्यायालयात हजर करणार होते. पण, संपूर्ण तालुक्यामधून मोठ्या संख्येनं लोकांनी गर्दी केली होती. लोकांनी तुफान गर्दी केली होती. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तपास अधिकाऱ्यांनी आरोपीला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोर्टात हजर करण्यात यावे अशी मागणी पत्राद्वारे केली होती. कोर्टाने मागणी मंजूर केली आणि व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी झाली.
आरोपीचं वकिलपत्र कुणीचं स्विकारलं नाही
आरोपी विजय खैरनार याने न्यायालयामध्ये अर्ज केला होता. शासकीय खर्चाने मला वकील देण्यात यावा, अशी मागणी केली होती. पण, आरोपीचं कृत्य पाहत मालेगाव वकिल संघाने वकिलपत्र न घेण्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे त्याची मागणी फेटाळण्यात आली. एवढंच नाहीतर मानसिक रुग्ण असल्याचा बनावही केला, पण तो वैद्यकीय तपासणीमध्ये फीट असल्याचं समोर आलं.
