भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसची विचारसरणी अगदी दोन टोकांवर. परंतु स्थानिक राजकारण आणि प्रिय 'विकासाचे' नाव सांगून राज्यातल्या अनेक भागांत काँग्रेस-भाजप, भाजप-एमआयएम अशा युती आघाडी होण्याचा प्रयत्न झाला. परंतु प्रखर टीका झाल्यानंतर युती आघाडी मागे घेऊन कारवाई करीत असल्याचे पक्षांकडून दाखविण्यात आले. आताही मालेगावात काँग्रेस भाजपकडून युतीचा प्रयत्न झाला.
आमची नोंदणी रद्द करा, भाजप नगरसेवकांचे आयुक्तांना पत्र
advertisement
आधी भाजपचे दोन आणि काँग्रेसचे तीन सदस्यांनी एकत्र येऊन गटस्थापनाचे प्रयत्न केला खरा. परंतु आज दोन्ही पक्षाचे ध्येय धोरण वेगवेगळे असल्यामुळे आम्ही वेगळे होत आहोत. त्यामुळे आमच्या गटाची नोंदणी करण्यात येऊ असे पत्र भाजपच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांना दिले आहे.
मालेगाव महापालिकेत काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्याने राज्यभरात आश्चर्य व्यक्त केले जात होते. मात्र या युतीची राज्यात तसेच विशेषत: नाशिक जिल्ह्यात जोरदार चर्चा झाल्याने काँग्रेसने तत्काळ कारवाई करीत प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला.
काँग्रेस पक्षाकडून गंभीर दखल, शहराध्यक्षाची हकालपट्टी
मालेगाव महापालिकेत सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर आज एक मोठी राजकीय घडामोड घडली. भाजपच्या दोन नगरसेवकांशी हात मिळवणी करत काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भारत विकास आघाडीची स्थापना केली होती. याची काँग्रेस पक्षाने गंभीर दखल घेतली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एजाज बेग यांची शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी केली. शिवाय त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवून त्यात सात दिवसात खुलासा मागविला आहे. या घटनेमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकच खळबळ उडाली असून एजाज बेग यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.
