TRENDING:

रडू नको बाळा....मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांना दिलं खुलं चॅलेंज; धाराशिवमध्ये वातावरण तापलं

Last Updated:

मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य करत रडू नको बाळा हे गाणं लावत दंड थोपटले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव:    जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची निवड झाली. अध्यक्षपदाच्या निवडीनंतर मात्र पाटील कुटुंबाचे राजकीय विरोधक असलेले निंबाळकर हे आक्रमक झाले आहेत. या निवडीनंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जय राजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना खुन्नस देत डिवचण्याचा प्रयत्न केला. बाळा नाद करायचा नाही असं म्हणत आता लोकसभा हे आपलं टार्गेट असल्याचे सांगत मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य केलेआहे.
News18
News18
advertisement

धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. आपल्या पत्नीला त्यांनी अध्यक्ष देखील केले मात्र अर्चना पाटील या अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर पाटील कुटुंब व निंबाळकर कुटुंब यांच्यातील राजकीय हाडवैर उफाळून आले. पत्नी अध्यक्ष झाली म्हणून कार्यकर्त्यांचे आभार मानत असलेल्या राणा पाटील यांना जय राजे निंबाळकर यांनी खुन्नस देत मागे बघ असं म्हणत अंगाला अंग लावत खेटून जाण्याचा प्रयत्न केला.

advertisement

रडू नको बाळा.... गाणं लावत दिलं चॅलेंज 

एवढंच नाही तर जय राजे निंबाळकर यांनी राणा पाटील यांच्या बाजूलाच गाडी लावत काही काळ राजकीय संघर्ष निर्माण करण्याचा देखील प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत जय राजे निंबाळकर यांना या गोंधळातून बाहेर काढले त्यामुळे राजकीय संघर्ष टाळला. जयराजेंच्या या कृतीनंतर मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य करत रडू नको बाळा हे गाणं लावत दंड थोपटत आता लोकसभा लक्ष असल्याचं सांगत खासदार ओम राजे निंबाळकर यांना चॅलेंज दिले आहे.

advertisement

तुमचं कर्तृत्व सांगा मग ओमराजे निंबाळकरांवर टीका करा

मल्हार पाटील यांच्या या चॅलेंजला खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र दुर्लक्षित केले आहे.   तू साधा ग्रामपंचायत सदस्य नाही तुम्ही पैशाच्या जोरावरच राजकारण करत आईला जिल्हा परिषद अध्यक्ष केलं तुमचं कर्तृत्व सांगा मग ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका करा असं प्रतिउत्तर दिला आहे.

advertisement

वाद उफाळला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
झोपताना मोबाईल पाहताय? वेळीच सोडा सवय, नाहीतर मेंदूवर होतील हे परिणाम
सर्व पहा

निंबाळकर आणि पाटील कुटुंबीय हे बहुबंदकीचे नातलग जरी असले तरी पवनराजे हत्याकांडापासून या दोन्ही कुटुंबात मोठं वैर आहे. कोणतीही निवडणूक असली तरी खासदार ओमराजे निंबाळकर व राणा जगजीत सिंह पाटील हे एकमेकांसमोर उभा राहतात. या निवडणुकीत मात्र मल्हार पाटील हे ओमराजे निंबाळकर यांच्यावर कायम आक्रमकपणे टीका करताना दिसत आहेत. त्यातच आता खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू जय राजे निंबाळकर यांनीही राहणार पाटील यांना खुन्नस देत या राजकीय आखाड्यात उडी घेतल्याने ओमराजे निंबाळकर राणा पाटील यांच्यातील वाद आता जय राजे व मल्हार पाटील यांच्या पर्यंत येऊन पोहोचला आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
रडू नको बाळा....मल्हार पाटलांनी ओमराजे निंबाळकरांना दिलं खुलं चॅलेंज; धाराशिवमध्ये वातावरण तापलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल