मराठा समाजाला दिल्लीत घेऊन जात तिथे शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने आता मनोज जरांगे तयारी लागले आहेत. दरम्यान, जालन्यात मराठा आरक्षणाच्या बैठकीत एक विचित्र प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील सरपंचाच्या शेतात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. पण या बैठकीतून अचानक मनोज जरांगे यांच्यासह मराठा कार्यकर्त्यांना घटनास्थळावरून पळून जावं लागलं.
advertisement
बैठकीत नक्की काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, मनोज जरांगे यांनी रविवारी अंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या शेतात एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीला मराठवाड्यातील मोजके मराठा आंदोलक आणि समन्वयक येणार होते. ठरल्याप्रमाणे या बैठकीला सुरुवात झाली. तोपर्यंत सर्वकाही सुरळीत सुरू होतं. मात्र अचानक घटनास्थळी एक मोहोळ उठलं आणि मधमाशांनी बैठकीतील लोकांवर हल्ला केला.
हा हल्ला होताच मनोज जरांगे यांच्यासह मराठा आंदोलक आणि समन्वयकांना घटनास्थळावरून पळून जावं लागलं. यावेळी समन्वयाकांनी जरांगे यांना सर्व बाजुने घेरलं. डोक्यावर गमछा टाकून त्यांना तिथून बाहेर काढलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा हल्ला किरकोळ स्वरुपाचा होता. अचानक अशाप्रकारे मधमाशांनी हल्ला केल्याने अनेक आंदोलक सैरभैर झाले. यावेळी काहीजणांना मधमाशांनी दंश केल्याची माहिती आहे.