नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
पश्चिमेकडून आलेल्या वाऱ्यामुळे पश्चिमेकडेच पुतळा कसा काय कोसळला? यात राजकारण होऊ नये, सरकारने याची चौकशी केली पाहिजे. कायद्यामध्ये बदल केला पाहिजे आणि कुठल्याच कॉन्ट्रॅक्टरला सोडलं गेलं नाही पाहिजे. त्याला आयुष्यभर जेलमध्ये टाकलं पाहिजे. सरकारनं महापुरुषांच्या स्मारकांकडे बारकाईनं लक्ष दिलं पाहिजे. असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, 'विरोधी पक्ष आणि सत्ताधारी दोघेही राजकारण करत आहेत. महाराष्ट्र बघतो आहे, तुम्हाला वाटत असेल तुम्ही शहाणे आहात. छत्रपतींच्या जीवावर कुणीही राजकारण करू नका. जनता तुमचा कार्यक्रम लावणार आहे. तुम्ही उघडे पडायला लागला आहात, इथे भांडणं झाली ती फक्त खुर्च्या मिळवण्यासाठी. यांना दु:ख नाही. त्यांना जर अपमान वाटला असता ते या घटनेच्या मुळाशी गेले असते, इथे स्मारक सुद्धा उभा राहणं गरजेचं आहे. वेळ लागला तरी चालेल पण इथे दर्जेदार स्मारक व्हावं. प्रचंड मोठ स्मारक व्हावं पण ते टिकाऊ व्हावं. मला या जागेवर राजकारण करायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.