मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आज परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची आणि मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांच्या भेट घेणार आहेत. या निमित्त दौऱ्यावर निघालेल्या मनोज जरांगे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितले की, राज्यात सगळे परेशान आहेत.शेतकरी अडचणीत आहेत.परभणी मस्साजोग प्रकरणामुळे राज्य अशांत आहे. आणि हे सगळे बंगल्यासाठी भांडतायत,अशी टीका त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली. छगन भुजबळ यांनीही कितीही नेते एकत्रित केले तरी आता त्यांना कुणी विचारणार नाही, असा चिमटा जरांगेनी त्यांना काढला आहे.
advertisement
आताचे मुख्यमंत्री फडणवीस तेंव्हा म्हणत होते मी आरक्षणाच्या आडवा येत नाही..आता तेच मुख्यमंत्री झाले आहेत त्यांनी आता करून दाखवावे नाही तर आंदोलन परवडणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. बीड मोर्चा शांततेतच होईल मी स्वतः जाणार आहे.गोर गरीब जनता आता सत्ताधाऱ्यांना जाब विचारेल,असे देखील जरांगे यांनी सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
हा मजा घेण्याचा प्रश्न नाही हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून मी असो अजित पवार असो एकनाथ शिंदे असो आमच्या भूमिकेत कुठलंही अंतर नाही... पूर्वी आम्ही मिळून निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
