मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. दसरा मेळाव्यात बोलताना पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं होतं. मराठा समाजाला आरक्षण दिलं, आम्हाला आनंद आहे. पण काहींना आरक्षणाच्या आडून ओबीसीतून आरक्षण घ्यायचंय', असं धनंजय मुंडेंनी म्हटलं होतं. यावरूनच मनोज जरांगेनी धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. माझ्या नादी लागू नको, नाहीतर मी बाजार उठवेल असे म्हणत मनोज जरांगेंनी थेट इशारा दिला आहे.
advertisement
दसरा मेळाव्यातील वक्तव्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, तुम्ही बंजारा समाजाचा आरक्षण का घेतला? - तू माझ्या नादी लागू नको, तुला क्लिअर सांगतो. शहाणपणा करू नको, मी दादा मोजत नसतो. माझ्या नादी लागला तर दोघांचा बाजार उठवेल, तुझ्यासोबत अजित पवारांचा देखील... जो जो प्रचाराला येईल त्याला पाडणार आहे.
धनंजय मुंडे ज्यांच्या प्रचाराला जाणार, तो उमेदवार पाडणार: मनोज जरांगे
तू किती हुशार आहे मला माहिती, माझी नादी लागू नका... तुमच्या दोघांचा राजकीय करिअरचा देव्हारा करू... तुम्ही मराठे आणि माझ्या नादी लागू नका, राजकारणातून तुम्हाचा नामोनिशाण मिटवेल.. हे ज्यांच्या ज्यांच्या प्रचाराला येतील त्यांना पडणार मग ते मराठ्यांचे असले तरी पाडू.. आता तुम्हाला पुढे पुढे कळेल काय होईल, असा थेट इशाराच मनोज जरांगेंनी दिला आहे.
बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या, मनोज जरांगेंचा पंकजा मुंडेंवर निशाणा
आमच्या ताटातले घेऊ नका, असे पंकजा मुंडे म्हणाल्या यावर बोलताना मनोज जरंगे पाटील म्हणाले की, त्यांना आम्ही मोजत नाही. तुम्ही लोकांच्या ताटातले ओरबाडून खातात आणि तुम्ही लोकांना ज्ञान शिकवत आहात. तुम्ही त्या बंजारा समाजाच्या पाच टक्के जागा खाल्ल्या. वाटोळ करून टाकलं आणि तुम्ही काय दुसऱ्यांना ज्ञान शिकवत आहात?
शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणार : मनोज जरांगे
मनोज जरांगे पुढे म्हणाले, मराठा आरक्षण मुद्दा संपल्यानंतर मी धनगर ,मुस्लिम, आरक्षणासाठी , शेतकऱ्यांसाठी लढणार आहे. सगळ्या शेतकऱ्यांना चर्चा करून एक ठिकाणी बोलवणार आणि हे आंदोलन ऐतिहासिक होणार आहे. जे शंभर वर्ष मिळाले नाही ते शेतकऱ्यांना मिळेल.