धनंजय मुंडेंना रोजगार हमीचे काम द्या तसेच त्यांना बराशी खोदायला लावा, फक्त मराठ्यांच्या नादाला लागू नका अन्यथा अजित दादांना देखील सोडणार नाही,अजित दादांचा कार्यक्रम लावणार असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
मनोज जरांगेंची छगन भुजबळांवर टीका
छगन भुजळांनीही धनंजय मुंडेंच्या वक्तव्यावर मिश्किल भाष्य केलंय. पक्ष त्यांच्या विचार जरूर करेल. पण तोपर्यंत माझ्याकडे एक काम आहे. गोपीनाथ मुंडे आपल्यासाठी जे ओबीसी आरक्षणाचं काम सोडून गेले आहेत त्यात तुम्ही सहभागी व्हावं, असे छगन भुजबळ म्हणाले. त्याववर मुंडे म्हणाले, लोकांना हा तसाच कामाला लावतो. मग अलीबाबाला खेळायला मैदान मोकळं राहते. हा फुकटात काम करून घेतो.
advertisement
निधीच्या अडचणींची कारण सांगू नका: मनोज जरांगे
मराठवाड्यातील अतिवृष्टीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, 'सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे.शेतकऱ्यांचं म्हणनं ऐकून घ्यावे आज सरसकट मदत करावी,नुकसान लाखांचं आणि मदत 3 हजारांची असं सरकारने करू नये. निधीच्या अडचणींची कारण सांगू नका.
काय म्हणाले धनंजय मुंडे?
माझ्या हाताला आता काहीतरी काम द्या. कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहा. आम्ही चुकलो तर कान धरा, पण आता आम्हाला रिकामं ठेवू नका. आम्हाला जबाबदारी द्या, असं मुंडे यांनी म्हटलं आहे.
बऱ्याच महिन्यानंतर पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय
दरम्यान, बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांचे नाव आल्यानंतर धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर, काही काळ ते वैद्यकिय कारणास्तव सार्वजनिक कार्य्रकमापासून दूर होते. आता, ते पक्षाच्या कार्यक्रमात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे.