अजय बारस्कर यांचा देहू आणि देहू संस्थानशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे. तर देहू संस्थान हे मनोज जरांगे यांच्या पाठीशी असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. कार्ला फाटा येथे रास्ता रोको आंदोलन झाल्यानंतर मावळ मधील मराठा आंदोलक हे देहूतील संत तुकाराम महाराजांच्या वंशजांना भेटण्यासाठी गेले. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी वक्तव्य करणाऱ्या अजय बारस्कर यांचा निषेध देहू संस्थान कडून व्यक्त करण्यात आला.
advertisement
बारस्करांवर हल्ल्याचा प्रयत्नाचा पोलिसांना संशय
दरम्यान, अजय महाराज बारस्कर आझाद मैदानाजवळील प्रेस क्लब येथे मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेणार होते. मात्र ती प्रेस रद्द करून ते चर्चगेटजवळील हॉटेल ऑस्ट्रियामध्ये थांबले. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. अजय बारस्कर यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर अजय बारस्कर यांनी आपल्याला फोनवर धमक्या येत असल्याचं सांगितलं होतं. सध्या अजय बारस्कर हे मुंबईत थांबलेले आहे. चर्चेगेट परिसरातील आझाद मैदानाजवळ असलेल्या हॉटेल ऑस्ट्रिया इथं ते मुक्कामी आहे. या ठिकाणी संध्याकाळी 6.45 वाजेच्या सुमारास 5 ते 6 जणांनी बारस्कर यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.