TRENDING:

मराठवाड्यात 7 'डॉक्टर' उमेदवारांची निवडणुकीत हवा, स्टेथेस्कोपच्या ऐवजी आता हाती झेंडा

Last Updated:

मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेने डॉक्टरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई :  महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली. निवडणुकीसाठी पक्षांच्या आघाड्या आणि युतीचे उमेदवारही ठरले. गेल्या वर्षांत राजकारणात बरंच काही बदललं आहे. बऱ्याच ठिकाणी घराणेशाही पाहायला मिळते, काही ठिकाणी आरोपींना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींमध्ये मराठवाड्यात एक आश्वासक आणि सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. मराठवाड्यात भाजप आणि शिवसेनेने डॉक्टरांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
News18
News18
advertisement

मराठवाड्यात नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये तब्बल सात डॉक्टर निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजप आणि शिवसेनेकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. काही ठिकाणी तर डॉक्टर विरोधात डॉक्टर असा देखील सामना पाहायला मिळत आहे. बीड, संभाजीनगर, हिंगोलीतून डॉक्टर निवडणूक लढणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आता डॉक्टरांच्या हाती स्टेथोस्कोपऐवजी पक्षांचे झेंडे पाहायला मिळणार आहे. आता डॉक्टरांना जनमत मिळणार का हे आगामी निवडणुकीत स्पष्ट झाले आहे.

advertisement

मराठवाड्यातील कोणत्या मतदारसंघातून कोणत्या डॉक्टरला उमेदवारी?

दिनेश परदेशी ( M.B.B.S, M.D.)

छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर नगरपरिषेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाचे डॉ. दिनेश परदेशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकांपासून वैजापूर नगरपरिषदेवर डॉ. दिनेश परदेशी यांची सत्ता राहिली आहे.

सारिका क्षीरसागर ( M.B.B.S)

डॉ.सारिका योगेश क्षीरसागर यांनी बीड नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून नगरसेवक पदासाठी उमदेवारी अर्ज दाखल केला आहे. प्रभाग 15 मधून नगरसेवक पदासाठी माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे

advertisement

ज्योती घुमरे ( M.B.B.S, ENT Specialist)

भाजप बीड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी डॉ. ज्योती घुमरे यांनी भाजपकडून नगरपालिका नगराध्यक्ष पदाची उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. डॉक्टर ज्योती घुमरे या बीडचे सुप्रसिद्ध कान, नाक घसा तज्ञ डॉ.घुमरे यांच्या पत्नी आहेत.

डॉ. अनुजा अजित परमेश्वर ( M.B.B.S)

नगरपालिका निवडणुकीत भाजपने तुळजापूरमध्ये प्रभाग क्रमांक तीनमध्ये माजी नगरसेवक अजित परमेश्वर यांच्या कन्या डॉ. अनुजा अजित परमेश्वर यांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली आहे.

advertisement

डॉ. सारिका वाघ

धाराशिव जिल्ह्यातून कळंब नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपकडून प्रभाग क्र, ६ मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला 48 तासातच मोठा झटका, पाच उमेदवारांची चूक नडली; मोठा भूकंप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात झपाट्याने बदल, मका आणि कांद्याची काय स्थिती? इथं चेक करा
सर्व पहा

'घराणेशाही बिनविरोध'! कुणाची आई, कुणाची बायको, कुणाचा भाऊ, कुणाची सून... नेत्यांचे नातेवाईक बनले नगराध्यक्ष

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मराठवाड्यात 7 'डॉक्टर' उमेदवारांची निवडणुकीत हवा, स्टेथेस्कोपच्या ऐवजी आता हाती झेंडा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल