या वादळामुळे आतापर्यंत 204 ट्रेन आणि 70 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे चेन्नईसह तामिळनाडूतील काही जिल्ह्यांमध्ये सोमवारपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. सखल भागात पाणी साचल्यानं मोठं नुकसान झालं आहे. चेन्नई, चेंगलपेट, कांचीपुरम आणि तिरुवल्लूर जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटांसह पावसा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यातील आद्रर्ततेचे प्रमाण वाढणार आहे. पुढील चार दिवस राज्यांत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. तर आज आणि उद्या चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि गोंदियात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
advertisement