असदद्दुीन ओवैसींची एमआयएम संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटला कडवी झुंज देताना दिसत आहे. एमआयएम इथं तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनला आहे. भाजप आणि शिंदे गट वगळता ओवैसींनी सगळ्याच पक्षांना धोबीपछाड दिला आहे. ११५ पैकी ७३ जागेवरील कल हाती आले असून यात भाजप, शिंदे गट आणि एमआयएममध्ये चुरस बघायला मिळत आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा सविस्तर निकाल
भाजप- २४
शिवसेना १८
राष्ट्रवादी - १
शरद पवार - १
यूबीटी - ७
काँग्रेस - २
वंचित - ४
एमआयएम - १५
छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे गटात असलेल्या वादाचा मोठा फटका निवडणुकीत बसल्याचं दिसत आहे. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी राशीद मामू यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. शिवाय मतदानाच्या चार दिवस आधीपासून शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे प्रचारातून गायब असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. ठाकरे गटाच्या अंतर्गत वादाचा फटका संभाजीनगरमध्ये ठाकरेंना बसल्याचं दिसत आहे. एकेकाळी बालेकिल्ला राहिलेल्या संभाजीनगरात शिवसेना ठाकरे गटाची वाईट अवस्था झाल्याचं दिसत आहे. इथं शरद पवार आणि अजित पवारांनाही इथं साजेशी कामगिरी करता आली नाही.
