आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नवनियुक्त मंत्री
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी राज्याचे बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी अभिवादन केले. यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी विधान परिषदेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक -निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली.
advertisement
रामराजे यांच्यातली राजकीय शक्ती संपली, त्यांच्यात आता त्राण राहिला नाही
रामराजे आणि आमच्यातील संघर्ष संपला कारण त्यांच्यात त्राण, शक्ती राहिली नाही. रामराजेंना स्वतःला ते कोणत्या पक्षात आहेत हे माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. फलटण म्हणजे केवळ रामराजे नाही. त्यामुळे त्यांच्याशी काय संघर्ष करायचा, असे जयकुमार गोरे म्हणाले.
ज्यांनी आम्हाला पाण्यापासून दूर ठेवले, त्यांच्याशी आमचा संघर्ष केला
आघाडी सरकारमध्ये रामराजे निंबाळकर यांच्याकडे कृष्णा खोऱ्याचा कार्यभार होता. त्यामाध्यमातून त्यांनी फलटण तालुका दुष्काळमुक्त केला परंतु आमच्या तालुक्याला किंचितही पाणी द्यायचा प्रयत्न त्यांनी केला नाही. ज्यांनी आम्हाला पाण्यापासून वंचित ठेवले, त्यांच्याशी आमचा संघर्ष होता. मग ते रामराजे निंबाळकर असोत की शरद पवार असोत. परंतु आता माझा संघर्ष रामराजे निंबाळकर यांच्याशी नसेल. त्यांच्यातली राजकीय शक्ती क्षीण झाली आहे, अशी टीका जयकुमार गोरे यांनी केली.