TRENDING:

'हा भाऊ कायम तुझ्या...', मंत्री प्रताप सरनाईकांचं अनोखं रक्षाबंधन, दिली 5 लाखांची ओवाळणी

Last Updated:

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकरी अनिल मनोहर गुंड यांचा 25 जुलैला विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे गुंड कुटुंबाचं आधारछत्र हरपलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
धाराशिव: काही दिवसांपूर्वीच रक्षाबंधनाचा सण साजरा झाला. या दिवशी प्रत्येक भावाने अतिशय कौतुकाने आपल्या बहिणीकडून राखी बांधून घेतली. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एक आगळंवेगळं रक्षाबंधन साजरं केलं आहे. त्यांनी एका दिवंगत शेतकऱ्याच्या पत्नीकडून राखी बांधून घेत तिला लाखो रुपयांची ओवाळणी दिली आहे.
'हा भाऊ कायम तुझ्या...', मंत्री प्रताप सरनाईकांचं अनोखं रक्षाबंधन, दिली 5 लाखांची ओवाळणी
'हा भाऊ कायम तुझ्या...', मंत्री प्रताप सरनाईकांचं अनोखं रक्षाबंधन, दिली 5 लाखांची ओवाळणी
advertisement

धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील शेतकरी अनिल मनोहर गुंड यांचा 25 जुलैला विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. त्यांच्या निधनामुळे गुंड कुटुंबाचं आधारछत्र हरपलं आहे. धाराशिवचे पालकमंत्री असलेल्या प्रताप सरनाईक यांनी मृत शेतकऱ्याच्या पत्नीची गुरूवारी (14 ऑगस्ट) भेट घेतली. सरनाईक यांनी मृत शेतकऱ्यारी पत्नी असलेल्या सोनाली गुंड यांच्याकडून राखी बांधून घेतली आणि त्यांना 5 लाख रुपयांची ओवाळणी दिली.

advertisement

या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, दिवंगत अनिल गुंड यांच्याकडे फक्त 20 गुंठे शेती आहे. त्यांच्या मृत्यू झाल्यामुळे पत्नी सोनाली व त्यांच्या तीन मुलींच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही बातमी सरनाईक यांच्या कानावर गेली होती. गुंड कुटुंबाला आधार देण्यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी सोनाली यांच्याकडून राखी बांधून घेतली. "हा भाऊ कायम तुझ्या पाठीशी उभा राहील", असं आश्वासन देखील सरनाईक यांनी दिलं. अनिल गुंड यांचा मृत्यू झाल्याच्या तिसऱ्याच दिवशी मंत्री सरनाईक यांनी 1 लाख रुपयांचा चेक सोनाली गुंड यांना दिला होता. 14 ऑगस्ट रोजी राखी बांधून घेतल्यानंतर पुन्हा 4 लाख रुपयांचा चेक ओवाळणी म्हणून दिला.

advertisement

Success Story: एका एकरात केली 340 झाडांची लागवड, शेतकऱ्याला 6 लाख उत्पन्न, असं काय केलं?

गावकऱ्यांनी देखील केली मदत

दिवंगत शेतकरी अनिल गुंड यांना ईश्वरी, मेघाराणी आणि स्वरा या तीन मुली आहेत. ईश्वरी इयत्ता पाचवीत, मेघाराणी इयत्ता दुसरीत तर स्वरा अंगणवाडीत शिकते. अनिल यांच्या मृत्यूनंतर गुंड कुटुंबाच्या मदतीसाठी खामसवाडीतील गावकरी एकवटले आहेत. गावातील बचत गट, जगदंबा कन्या प्रशाला शिक्षक ग्रुप, क्लासमेट ग्रुप यांनी पैसे जमा करून या कुटुंबाला आर्थिक मदत केली.

advertisement

शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणार

पंतप्रधान आवास योजनेतून सुनिता गुंड यांना घरकुल आणि शासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळवून देण्याचं आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे 2 लाख रुपये, महावितरणकडून 4 लाख रुपये, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे 20 हजार रुपये, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेतून दरमहा दोन्ही मुलींना 2200 रुपये अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन मंत्री सरनाईक यांनी दिलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'हा भाऊ कायम तुझ्या...', मंत्री प्रताप सरनाईकांचं अनोखं रक्षाबंधन, दिली 5 लाखांची ओवाळणी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल