छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढणारे भाजप आणि शिवसेना आता पुन्हा एकदा एकत्र येण्यासाठी हालचाल करत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जागावाटपासाठी बैठक सुरू आहे. पण, या बैठकीमध्ये शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट तडकाफडकी बाहेर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महायुतीची जागा वाटपाबाबत बैठक सुरू होती. गेल्या एक तासापासून ही बैठक होती. मात्र जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने मंत्री संजय शिरसाट तडकाफडकी बैठकीतून बाहेर पडले, शेवटी काही वेळाने संदिपान भुमरे बाहेर येऊन शिरसाट यांना पुन्हा बैठकीत घेऊन गेले आहे.
संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया
प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जेव्हा संजय शिरसाट यांना विचारणा केली असता, "तुम्ही कशाला इकडे कॅमेरे फिरवत आहात", असं बोलून पुढे बोलण्याचं टाळलं.
दिवसभरातून दुसरी बैठक
मात्र, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची दिवसभरातली ही दुसरी बैठक आहे. महापालिकेच्या वेळी तब्बल 12 बैठकी होऊनही तुटली युती होती. आजच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या युती संदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाच्या वतीने मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, आमदार संजय केनेकर उपस्थित आहे. तर शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदिपान भुमरे, आमदार रमेश बोरणारे आणि आमदार संजना जाधव उपस्थित आहे.
