केशरी शिरा बनवण्यासाठी साहित्य
रवा, साखर, तूप, वेलची पावडर, मनुके, काजू, बदाम, खायचा केशरी रंग आदी.
Recipe Video: बाजारात आल्या ओल्या तुरी, ताकात बनवा टेस्टी आमटी, झटपट रेसिपी
केशरी शिरा बनवण्याची कृती
केशरी शिरा बनवण्यासाठी सुरुवातीला पॅन गरम करा आणि त्यात 2 टेबलस्पून साजूक तूप घाला. तूप पातळ झाले की त्यात एक वाटी जाड रवा घालून मंद आचेवर 8-10 मिनिटे भाजून घ्या. तो हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा भाजताना तो कोरडा वाटल्यास थोडे तूप आणखी घालू शकता.
advertisement
रवा भाजताना बाजूला 4 वाटी पाणी उकळून ठेवा आणि त्यात थोडा केशरी रंग घालून मिक्स करा. हे गरम पाणी थोडे थोडे करून भाजलेल्या रव्यामध्ये घाला. नंतर पाऊण वाटी साखर आणि वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा. पॅन झाकून शिरा 2-3 मिनिटे शिजू द्या. नंतर झाकण काढून हलवा आणि पुन्हा 3-4 मिनिटांसाठी शिजू द्या. गरज पडल्यास थोडे गरम पाणी घालू शकता.
शिरा तयार झाल्यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा. शिरा बनवताना नेहमी साजूक तुपाचा वापर करा. तेल किंवा डालडा वापरल्यास तो तितकासा स्वादिष्ट होत नाही. अशा पद्धतीने बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी आणि खास रेसिपी नक्की ट्राय करू शकता.





