Recipe Video: बाजारात आल्या ओल्या तुरी, ताकात बनवा टेस्टी आमटी, झटपट रेसिपी
- Reported by:Pragati Bahurupi
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Olya Toorichya Danyachi Aamti Receipe: हिवाळ्यात ओल्या तुरीच्या दाण्यांपासून विविध पदार्थ बनविले जातात. त्यातीलच एक म्हणजे चटपटीत अशी ताकाची आमटी. तुरीचे दाणे, ताक आणि इतर मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते.
महाराष्ट्र: हिवाळ्यात ओल्या तुरीच्या दाण्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. त्यातीलच एक म्हणजे चटपटीत अशी ताकाची आमटी. तुरीचे दाणे, ताक आणि इतर मोजक्या साहित्यात ही रेसिपी तयार होते. ज्वारीच्या भाकरीसोबत ही आमटी अतिशय टेस्टी लागते. जाणून घेऊया चटपटीत आमटीची रेसिपी...
तुरीचे दाणे, ताक, कोथिंबीर, जिरे, हळद, मीठ, हिरवी मिरची, लसूण आणि तेल हे ओल्या तुरीच्या दाण्याच्या ताकातील आमटी बनविण्यासाठी लागणारे साहित्य आहे. ओल्या तुरीच्या दाण्याची ताकातील आमटी कशी बनवायची जाणून घेऊया, सर्वात आधी तुरीचे दाणे थोड तेल टाकून भाजून घ्यायचे आहेत. त्यांनतर त्यातच हिरवी मिरची आणि लसूण भाजून घ्यायचा आहे. भाजून घेतल्यानंतर हे दोन्ही मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे. त्यांनतर कढईत तेल टाकून गरम करून घ्यायचं आहे.
advertisement
तेल गरम झालं की, त्यात जिरे टाकून घ्यायचे आहे. जिरे तळतळले की त्यात हिरवी मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आहे. 5 मिनिट परतवून घेतलं की त्यात हळद आणि मीठ टाकायचं आहे. त्यांनतर दाणे आणि ताकाचे मिश्रण त्यात टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्याला उकळी काढून घ्यायची आहे. उकळी काढून घेतली की, आमटी तयार झालेली असेल. त्यात कोथिंबीर टाकून ती आमटी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा.
Location :
Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 9:02 PM IST








