माघी गणेश जयंती: बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा खास रेसिपी, सगळे विचारतील बनवली कशी? Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Recipe: गणपतीला प्रसाद म्हणून मोदक आणि शिरा दिला जातो. यंदा माघी गणेश जयंतीला खास नैवद्य बनवू शकता.
पुणे: माघी गणेश जयंती उत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी श्री गणेशाची पूजा आणि आराधना केली जाते. यंदा 22 जानेवारीला हा उत्सव साजरा होणार आहे. अशा प्रसंगी गणपतीला प्रसाद म्हणून मोदक आणि शिरा दिला जातो. आज आपण तुपात बनवलेला केशरी शिरा कसा तयार करायचा? याचीच रेसिपी पुण्यातील गृहिणी वसुंधरा पाटकुले यांच्याकडून जाणून घेऊ.
केशरी शिरा बनवण्यासाठी साहित्य
रवा, साखर, तूप, वेलची पावडर, मनुके, काजू, बदाम, खायचा केशरी रंग आदी.
केशरी शिरा बनवण्याची कृती
केशरी शिरा बनवण्यासाठी सुरुवातीला पॅन गरम करा आणि त्यात 2 टेबलस्पून साजूक तूप घाला. तूप पातळ झाले की त्यात एक वाटी जाड रवा घालून मंद आचेवर 8-10 मिनिटे भाजून घ्या. तो हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा. रवा भाजताना तो कोरडा वाटल्यास थोडे तूप आणखी घालू शकता.
advertisement
रवा भाजताना बाजूला 4 वाटी पाणी उकळून ठेवा आणि त्यात थोडा केशरी रंग घालून मिक्स करा. हे गरम पाणी थोडे थोडे करून भाजलेल्या रव्यामध्ये घाला. नंतर पाऊण वाटी साखर आणि वेलची पावडर घालून चांगले मिक्स करा. पॅन झाकून शिरा 2-3 मिनिटे शिजू द्या. नंतर झाकण काढून हलवा आणि पुन्हा 3-4 मिनिटांसाठी शिजू द्या. गरज पडल्यास थोडे गरम पाणी घालू शकता.
advertisement
शिरा तयार झाल्यावर आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा. शिरा बनवताना नेहमी साजूक तुपाचा वापर करा. तेल किंवा डालडा वापरल्यास तो तितकासा स्वादिष्ट होत नाही. अशा पद्धतीने बाप्पाच्या नैवेद्यासाठी अगदी सोपी आणि खास रेसिपी नक्की ट्राय करू शकता.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 5:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
माघी गणेश जयंती: बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा खास रेसिपी, सगळे विचारतील बनवली कशी? Video








