समोर आलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांचा कारचालक बसवंत कडोलकर यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात कारचालक जखमी झाला असून सध्या त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अद्याप हल्ल्याचे कारण समोर आलेले नाही.
advertisement
नेमका कसा झाला हल्ला?
अज्ञातांनी अचानक बसवंत यांच्यावर चाकूने वार करत घटनास्थळावरून पळ काढला असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकही तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मृणाल हेब्बाळकर यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन जखमी चालकाच्या उपचारांची योग्य ती व्यवस्था केली.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून, सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलिसांकडून अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे.
