ठाणे ते बोरिवली 12 मिनिटांत
सध्या ठाणे ते बोरिवली प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे या प्रवासासाठी भुयारी मार्ग बांधण्यात येत आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालून हा भुयारी रस्ता जाणार आहे. या भुयारी मार्गामुळे ठाणे ते बोरिवली हे अंतर सुमारे 12 मिनिटांत पार करता येईल. भुयारी मार्गात सिग्नल नसल्याने वाहनांना विनाअडथला प्रवास करणे शक्य होईल. हा प्रकल्प 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
advertisement
याशिवाय, ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवरून जर थेट मरीन ड्राईव्हपर्यंत जायचं असेल तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. ठिकठिकाणी वाहनांच्या रांगा सहन करत मजलदरमजल करत मरीन ड्राईव्हवर पोचण्यासाठी वेळेचा प्रचंड अपव्यय होतो. दक्षिण मुंबईतील या वाहतूककोंडीवर मात करण्यासाठी पी डी'मेलो मार्गावरील ऑरेंज गेटपासून मरीन ड्राईव्हपर्यंत भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे.
यामार्गावर दोन बोगदे बांधण्यात येणार आहेत. त्यापैकी एका बोगद्याची लांबी सुमारे 4.27 किलोमीटर तर दुसऱ्या बोगद्याची लांबी 2.24 किलोमीटर आहे. शिवाय त्यात 3.2 मीटर रुंदीच्या दोन मार्गिका तर एक आपत्कालीन मार्गिका बांधली जाणार आहे. या बोगद्यापर्यंत पोहोचण्यासाठी 190 मीटरचा मार्ग बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी 'लार्सन अँड टुब्रो' या कंपनीला कंत्राट मिळालेलं आहे.
या प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएला राज्य सरकारकडून सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. भुयारी मार्गासाठी एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज मिळालं आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यानच्या कामासाठी 90 कोटी रुपये आणि ठाणे ते बोरिवली दरम्यानच्या कामासाठी 210 कोटी रुपये देण्यासा नगरविकास विभागाने मान्यता दिली आहे.