राज ठाकरे म्हणाले की, आज संधी आलीय आणि माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. तुम्ही सर्वांना संधी दिलीत, या निवडणुकीत मतदारांनी क्रांती केली पाहिजे. दरवर्षी दसऱ्याला आपण आपट्याची पाने वाटतो, आपल्या हातात आपट्याची पाने सोडून काहीच नाही राहत, बाकीचे सगळे सोने लुटून चाललेत.
दरवर्षी आपण दसऱ्याला सोने लुटतो, एकमेकांना शुभेच्छाही देतो. पण महाराष्ट्राचं सोनं अनेक वर्षांपासून लुटलं जात आहे. आपण फक्त एकमेकांना आपट्याची पानं वाटतो. आपल्या हातात आपट्याची पानं सोडून काहीच राहत नाही. बाकीचे सगळे सोनं लुटुन चाललेत. आपल्या हाती मोबाईल आला, टीव्ही आला म्हणजे प्रगती नाही. आजचा दसरा मेळावा महत्त्वाचा आहे कारण आगामी निवडणुका आहेत असंही राज ठाकरे म्हणाले.
advertisement
निवडणुकीच्या तोंडावर असलेला हा दसरा खूप महत्त्वाचा आहे. अशा वेळी तुम्ही सावध रहायला हवं. तुमच्यातला राग मला कधीच दिसत नाही. त्याच त्याच लोकांना निवडून देता. मतदानाच्या दिवशी तुम्ही मतांचं शस्त्र ठेवून देता आणि नंतर बाहेर काढता. तुम्ही सर्वांना संधी देता. तुम्ही ज्यांना सांभाळलं त्यांनी तुमच्यासोबत प्रतारणा केली. आता शमीच्या झाडावरचं शस्त्र बाहेर काढण्याची हीच वेळ असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
निवडणुकीत तुम्ही क्रांती करायला हवी. मी गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय. हे स्वप्न साकारण्याची संधी मला मिळू द्या. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र मला बनवायचाय. मतदानादिवशी तुम्ही या सगळ्या लोकांचा वेध घ्या असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं.