TRENDING:

Badlapur News: बदलापूरमध्ये मराठी- अमराठीचा वाद पेटला, अपशब्द वापरल्यामुळे मनसैनिकांनी दिला चांगलाच चोप

Last Updated:

Badlapur Hawker News : बदलापूरमध्ये एका परप्रांतीयाला काही मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे. मराठी भाषेविषयी आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मनसैनिकांनी त्या परप्रांतीय व्यक्तीला चांगलाच चोप दिला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
बदलापूर: बदलापूरमध्ये एका परप्रांतीयाला काही मनसैनिकांनी चांगलाच चोप दिला आहे. मराठी भाषेविषयी आणि मराठी माणसाबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मनसैनिकांनी त्या परप्रांतीय व्यक्तीला चांगलाच चोप दिला आहे. बदलापूर रेल्वे स्थानका नजीकच ही घटना घडली आहे. हा परप्रांतीय फेरीवाला असून त्याचा व्यवसाय रेल्वे स्थानकानजीकच असतो. नेमका काय प्रकार घडला, जाणून घेऊया...
Badlapur News: बदलापूरमध्ये मराठी- अमराठीचा वाद पेटला,  अपशब्द वापरल्यामुळे मनसैनिकांनी दिला चांगलाच चोप
Badlapur News: बदलापूरमध्ये मराठी- अमराठीचा वाद पेटला, अपशब्द वापरल्यामुळे मनसैनिकांनी दिला चांगलाच चोप
advertisement

बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानक परिसरामध्ये फेरीवाल्यांवर महानगर पालिकेकडून कारवाई सुरू होती. या दरम्यानच त्या फेरीवाल्याने मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल शिवीगाळ करत अपशब्द वापरले होते. दरम्यान याची माहिती बदलापुरातील मनसैनिकांना मिळताच त्यांनी त्या परप्रांतीय फेरीवाल्याला बेदम चोप देत, सर्व मराठी जनांची माफी मागायला भाग पाडलं. दरम्यान फेरीवाल्याला मारहाण केल्यानंतर त्याने हात जोडून घटनेबद्दल माफी मागितली. सध्या पोलिसांकडून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

advertisement

बदलापूर पश्चिमेमध्ये सकाळच्या सुमारास ट्रेंड्स शॉप समोर काही फळ विक्रेत्यांवर नगरपालिकेचे कर्मचारी कारवाई करत होते. त्यावेळी एका परप्रांतीय विक्रेत्याने महानगरपालिकेच्या कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली. शिवाय, त्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. झालेल्या हल्ल्यात एक कर्मचारी जखमी झालाय. यावेळी या परप्रांतीय विक्रेत्याने मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोपही करण्यात येतोय. सध्या हा बदलापूरातील व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेच्या माध्यमातून पुन्हा एकदा परराज्यातून आलेल्या लोकांची महाराष्ट्रामध्ये सुरू असलेली मुजोरी वाढत चालल्याचे पाहायला मिळतंय.

advertisement

बदलापूरामध्ये परप्रांतीय फळ विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यांची मुजोरी वाढत असल्याची तक्रार अनेकदा नागरिकांनी महानगर पालिकेकडे केली होती. यावेळी मनसैनिकांनी सर्वच फळविक्रेत्यांना, जर यापुढे मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा जर अवमान केलात. तर मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Badlapur News: बदलापूरमध्ये मराठी- अमराठीचा वाद पेटला, अपशब्द वापरल्यामुळे मनसैनिकांनी दिला चांगलाच चोप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल