छत्रपती संभाजीनगर शहरातील मोंढा नका या ठिकाणी असलेल्या 'नम्रता स्वीट' या दुकानात तब्बल 21 फ्लेवरचे मोदक विक्रीसाठी उपलब्ध आहेत. यामध्ये काही युनिक फ्लेवर्सचा देखील समावेश आहे. दरवर्षी या ठिकाणी 18 प्रकारचे मोदक असतात. पण, यावर्षी त्यांनी 21 प्रकारचे मोदक हे तयार केलेले आहेत. या मोदकांची किंमत 700 रुपये प्रति किलो ते 1800 रुपये प्रति किलो दरम्यान आहे.
advertisement
मोदकांचे फ्लेवर्स
मावा केशर मोदक, मथुरा मोदक, मावा ब्लॅक करंट मोदक, ऑरेंज मोदक, गुलकंद मोदक, खोबरा मोदक, चॉकलेट मोदक, पारंपरिक तळणीचे मोदक, पायनापल मोदक, मोतीचूर मोदक, काजू पिस्ता मोदक, काजू स्ट्रॉबेरी मोदक, स्पेशल कॉफी मोदक, स्पेशल बदाम मोदक, कॉफी किवी मोदक, काजू रोज मोदक, मावा टू इन वन मोदक, असे वेगवेगळ्या प्रकारचे या दुकानात उपलब्ध आहेत.
याशिवाय, या दुकानात मोठ्या आकाराचे मोदक देखील विक्रीसाठी आहेत. मिक्स फ्लेवरमध्ये उपलब्ध असलेल्या या एका मोदकाचं वजन अर्धा किलो आहे. सुंदर असे सजवलेले मोदक तुम्ही बापा समोर ठेवू शकता. या दुकानात 21 मोदकांचं प्लॅटर देखील उपलब्ध आहे. एका प्लॅटरमध्ये 21 फ्लेवर्सचे मोदक दिले जातात.