याप्रकरणी 39 वर्षीय पीडित महिलेने कवठेमहांकाळ पोलिसात बलात्कार व मारहाण करल्याची तक्रार दाखल केली असून कवठेमहांकाळ पोलिसांनी शंकर माने यांना बुधवारी सकाळी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, शंकर माने याने कुपवाड येथे रहिवासी असलेल्या 39 वर्षीय एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. 2007 सालापासून 23 ऑगस्ट 2025 दरम्यानच्या काळात संबंध होते. तसेच माने याच्यापासून एक अपत्य ही प्राप्त झाले असल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. ही घटना 2007 सालापासून 23 ऑगस्ट 2025 दरम्यानच्या काळात वारंवार घडली आहे.
advertisement
कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल
गेल्या आठवड्यात शंकर माने यांच्या कार्यालयात पीडित महिला आणि तिचा मुलगा कागदपत्राची मागणी करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी शंकर माने यांच्यासह आई शोभा मार्तंड माने,भाऊ सिद्धू मार्तंड माने,पत्नी सविता शंकर माने या तिघांनी मारहाण केल्याचेही पीडित महिलेने कवठेमहांकाळ पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत कवठेमहांकाळ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र भापकर करीत आहेत.