चंद्रपुरात 13 वर्षीय मुलीला आईनेच विहिरीत ढकललं. यानंतर आईने स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. तर 10 वर्षीय मुलाने पळ काढल्याने सुदैवाने मुलगा वाचला आहे. ही घटना सावली तालुक्यातील खेडी येथे घडली आहे. दर्शना दीपक पेटकर (वय 35) आणि समीक्षा दीपक पेटकर (मुलगी, वय13) अशी मृतांची नावं आहेत. आईने मुलीला विहिरीत ढकलून स्वतःही आयुष्य संपवलं आहे.
advertisement
बुधवारी दुपारी दर्शना यांनी दोन्ही मुलांसह खेडी येथील आपलं शेत गाठलं. त्यांनी आधी आपल्या मुलीला विहिरीत ढकललं. तर हे दृश्य पाहून मुलाने तिथून पळ काढला. त्यामुळे सुदैवाने त्याचा जीव वाचला आहे. त्यानंतर दर्शना यांनी स्वतः विहिरीत उडी घेतली. मुलाने पळत जात घडलेला प्रकार गावात सांगितला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महिलेनं इतकं टोकाचं पाऊल का उचललं? यामागचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही.
पतीनं केली पत्नीची हत्या -
राजस्थानमधूनही नुकतंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं होतं. यात सुनीता आज राजाराम यांनी एक महिन्यापूर्वीच आपापल्या घरातून पळून येऊन एका मंदिरात विवाह केला होता आणि तेव्हापासून ते दोघं एकत्र राहू लागले होते. सुनीताचे वडील बापूलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीचा पती म्हणजेच राजाराम हा रोज दारू पिऊन घरी येत असे आणि तिला रोज मारहाण करत असे; मात्र या वेळी प्रकरण इतकं वाढलं की त्याने बेदम मारहाण करून नंतर धारदार शस्त्रानं डोक्यावर वार करून तिची हत्या केली.