Love Marriage : 'तुमच्या मुलीला मारलंय', पत्नीची हत्या करून पतीचा सासऱ्यांना फोन, महिन्याभराआधीच केलं पळून जाऊन लग्न
- Published by:Shreyas
- trending desk
Last Updated:
महिन्याभराआधी पळून जाऊन लग्न केलं पण एका महिन्यातच पतीने पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यानंतर पतीने त्याच्या सासऱ्यांना फोन करून तुमच्या मुलीची हत्या केल्याचंही त्याने सांगितलं.
मुंबई : कुटुंबीयांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह आणि नंतर पती-पत्नीमध्ये होणारे वाद, कधीकधी हे वाद विकोपाला जाऊन घडणारा गुन्हा, अशा घटना देशाच्या कानाकोपऱ्यातून वाचायला मिळतात; मात्र राजस्थानात घडलेली घटना दोघांच्या विवाहानंतर अवघ्या महिनाभरातच घडल्याचं सांगितलं जात आहे. केवळ बाह्य आकर्षणाला प्रेम मानून होणारा विवाह आणि त्यानंतर प्रत्यक्ष संसार सुरू केल्यानंतर समोर येणारं वास्तव यात खूप तफावत दिसते. परस्पर सामंजस्याचा अभाव, जोडीदाराबाबतची अपुरी माहिती, आंधळा विश्वास, जोडीदारावरची संशयाची भावना यामुळे अनेकदा काही प्रेमविवाह दीर्घकाळ टिकू शकत नाहीत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनीता असं मरण पावलेल्या महिलेचं नाव आहे, तर राजाराम असं हत्या करणाऱ्या तिच्या पतीचं नाव आहे. सुनीता आणि राजाराम यांचा एक वर्षापूर्वी साखरपुडा झाला होता. कालांतराने या दोघांच्या कुटुंबीयांमध्ये काही कारणामुळे वाद झाला होता. कुटुंबीयांमध्ये वाद झाल्यामुळे कदाचित आपल्या विवाहात काही आडकाठी येऊ शकते किंवा विवाह करण्यास कुटुंबीय नकार देऊ शकतात. अशा प्रकारची शंका कदाचित निर्माण झाल्यामुळे सुनीता आणि राजाराम यांनी घरातून पळून जाऊन एका मंदिरात लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे त्यांनी एक महिन्यापूर्वीच आपापल्या घरातून पळून येऊन एका मंदिरात विवाह केला होता आणि तेव्हापासून ते दोघं एकत्र राहू लागले होते.
advertisement
सुनीताचे वडील बापूलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मुलीचा पती म्हणजेच राजाराम हा रोज दारू पिऊन घरी येत असे आणि तिला रोज मारहाण करत असे; मात्र या वेळी प्रकरण इतकं वाढलं की त्याने बेदम मारहाण करून नंतर धारदार शस्त्रानं डोक्यावर वार करून तिची हत्या केली.
राजाराम यानं केवळ पत्नी सुनीताची हत्याच केली असं नाही, तर या घटनेनंतर त्यानं सुनीताच्या वडिलांना म्हणजे आपल्या सासऱ्यांना फोन करून सांगितलं, की ''मी तुमच्या मुलीला मारून टाकलं आहे.'' तिचे वडील म्हणाले, की 'असा फोन येताक्षणी आम्ही घटनास्थळी गेलो आणि मुलीचा मृतदेह स्वास्थ्य केंद्रात नेला. आरोपीच्या विरोधात तक्रारही दाखल केली.'' पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
view commentsLocation :
Jhalawar,Jhalawar,Rajasthan
First Published :
March 07, 2024 6:21 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
Love Marriage : 'तुमच्या मुलीला मारलंय', पत्नीची हत्या करून पतीचा सासऱ्यांना फोन, महिन्याभराआधीच केलं पळून जाऊन लग्न


