नुकतेच, एमपीएससीने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून परिक्षेच्या तारखेची माहिती अर्जदारांना सांगितली आहे. दरवर्षी, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. सुधारित परिक्षांच्या नवीन वेळापत्रकानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा 9 नोव्हेंबर 2025 रोजी होणार आहे. तर, महाराष्ट्र गट- ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा 21 डिसेंबर 2025 होणार आहे, महाराष्ट्र गट- क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा २०२५ ही ४ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
advertisement
2025 साली होणार्या दिवाणी न्यायधीश कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षांची जाहिरात शासनाच्या सूचनेनुसार स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या परीक्षांसाठी नवीन वेळापत्रक तयार केले जाणार आहे.