एमपीएससीकडून 'गट- क'साठी होणाऱ्या नोकरभरतीमध्ये उद्योग निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक, कर सहाय्यक आणि लिपिक- टंकलेखक यांसारख्या विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. एकूण 938 पदांसाठी राज्यातील वेगवेगळ्या विभागासाठी बंपर नोकर भरती होणार आहे. उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातील उद्योग निरीक्षकासाठी 9 पदे असून याचा पगार एस-13 साठी (35,400- 1,12,400) इतका असणार आहे. वित्त विभागातील तांत्रिक सहाय्यकासाठी 4 पदे असून याचा पगार एस-10 साठी (29,200- 92,300) इतका असणार आहे. वित्त विभागातील कर सहाय्यकासाठी 73 पदे असून याची वेतनश्रेणी एस-8 साठी (25,500- 81,100) इतका असणार आहे. तर प्रशासकीय विभाग आणि विविध राज्य सरकारी कार्यालयांमधील लिपिक-टंकलेखकासाठी 852 पदे असून याची वेतनश्रेणी एस- 6 साठी (19,900- 63,200) इतका असणार आहे.
advertisement
परिपत्रकाच्या माध्यमातून सरकारने नोकरीची घोषणा केली असून ही पूर्व परीक्षा रविवार, 4 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रांवर आयोजित केली जाईल. अर्ज प्रक्रिया एमपीएससीच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. 7 ऑक्टोबर 2025 पासून दुपारी 02:00 वाजल्यापासून अर्जप्रक्रियेला सुरूवात होणार आहे. ऑनलाइन अर्ज सादर करण्याची आणि परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2025 असणार आहे. अर्ज आणि अर्ज शुल्क 27 ऑक्टोबरपर्यंत रात्री 11:59 वाजेपर्यंत अर्जदारांना भरता येणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनद्वारे शुल्क भरणाऱ्यांसाठी, चलनची प्रत मिळवण्याची अंतिम तारीख 27 ऑक्टोबर 2025 रोजी रात्री 11:59 वाजेपर्यंत आहे आणि बँकेत शुल्क जमा करण्याची अंतिम तारीख 30 ऑक्टोबर 2025 रोजी बँक कामकाजाच्या वेळेपर्यंत आहे.
महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्यांनाच या भरतीचा फायदा घेता येणार आहे. तर, सर्व आरक्षणाचे फायदे केवळ महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवासी असलेल्या उमेदवारांना लागू होतील, अशी माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून देण्यात आली आहे. जाहिरातीत अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास वर्ग (OBC), आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS), महिला, खेळाडू, दिव्यांग व्यक्ती (PwD), माजी सैनिक, प्रकल्प-प्रभावित व्यक्ती, भूकंप-प्रभावित व्यक्ती आणि अर्धवेळ पदवीधर यांच्यासाठी आरक्षणाचे तपशील दिले आहेत. प्रत्येक पदाप्रमाणे विशिष्ट पात्रता निकष, ज्यात शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा यांचा समावेश आहे, नमूद केले आहेत. रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होण्याची किंवा नवीन संवर्गांचा समावेश होण्याची शक्यता लक्षात घेऊनच अर्जदारांनी अर्ज करावा. रिक्त पदांची संख्या आणि आरक्षणाचे तपशील राज्य सरकारच्या निर्देशानुसार बदलण्याची शक्यता आहे.
दरम्यान, संयुक्त पूर्व परीक्षेसाठी परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. 394 आणि आरक्षित प्रवर्गांसाठी (SC, ST, OBC, EWS, अनाथ, माजी सैनिक) रु. 294 आहे. मुख्य परीक्षेसाठी, शुल्क खुल्या प्रवर्गासाठी रु. 544 आणि आरक्षित प्रवर्गांसाठी रु. 344 आहे. शुल्क क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे ऑनलाइन किंवा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये चलनाद्वारे ऑफलाइन भरता येते. शुल्क परत न करण्या योग्य आहे.