एमपीएससीने आज बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास साडे सात हजार उमेदवार परीक्षेसाठी बसले होते. आज आयोजित केलेल्या आयोगाच्या या बैठकीमध्ये मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवार गेले दोन दिवस परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, या मागणीसाठी आंदोलनाला बसले होते. अखेर एमपीएससीने नव्या तारख्या जाहीर केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले आहे
advertisement
MPSC ने आपल्या परिपत्रकात काय म्हटले?
राज्य सेवा पूर्व परीक्षा 2024 च्या सुधारित निकालानुसार नव्याने पात्र ठरलेल्या या 318 उमेदवारांना राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 च्या पूर्वतयारीसाठी पुरेसा अवधी मिळाला नसल्यामुळे दिनांक 26 ते 28 एप्रिल, २०२५ या कालावधीत नियोजित मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याबाबत उमेदवारांकडून आयोगास निवेदने प्राप्त झाली आहेत. उमेदवारांकडून प्राप्त निवेदने तसेच इतर सर्व बाबींचा साकल्याने विचार करून प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 सुधारित वेळापत्रकानुसार दिनांक 27, 28 आणि २९ मे 2025 या कालावधीत घेण्यात येईल. .
MPSC विद्यार्थ्यांच्या मागण्या काय होत्या ?
- मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलाव्या
- अ राजपत्रित परीक्षेत पदांची संख्या वाढवावी
- PSI, STI, ASO, SR या पदांची संख्या वाढवावी
- SEBC-EWSच्या निकालातील चुकांविरोधात आंदोलन
विद्यार्थ्यांनी केले होते आंदोलन?
पुणे, छत्रपती संभाजीनगरात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होते. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला होता. MPSC ने परीक्षा पुढे ढकलल्याचे नोटिफिकेशन काढल्यापासून 45 दिवसानंतर राज्यसेवा मुख्य परीक्षा घेण्यात यावी...MPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या अ राजपत्रित परीक्षेत PSI, STI, ASO आणि SR या पदांची संख्या वाढवण्यात यावी, अशा मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत