याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमआरव्हीसी) मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने दक्षिण मुंबईतील उपनगरीय रेल्वे अंडरग्राऊंड करण्याचा विचार केला आहे. एमआरव्हीसीने पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेंट्रल सेक्शन आणि मुंबई सेंट्रल जवळील मार्ग भूमिगत करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
BEST Bus: गोरेगावातील बेस्टमध्ये मोठा बदल! मिडीबस होणार बंद, प्रवाशांना मिळणार नवीन पर्याय
advertisement
दक्षिण मुंबईतील प्रस्तावित भुयारी कॉरिडॉर पूर्णपणे रेल्वेच्या मालकीच्या जमिनीखाली बांधण्याची योजना आहे. या भूमिगत लोकल ट्रेनच्या संदर्भात करण्यात येणाऱ्या अभ्यासात भायखळा येथे एक प्रमुख इंटरचेंज हब विकसित करण्याच्या शक्यतेचा देखील समावेश आहे. ही शक्यता प्रत्यक्षात आल्यास शहराच्या वाहतूक कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढेल.
याशिवाय, मध्य रेल्वेच्या सीएसएमटी आणि परळ स्टेशनदरम्यान दोन अतिरिक्त उपनगरीय मार्गांचं बांधकाम करण्याचा अभ्यास देखील करण्यात आला आहे. जर हा प्रकल्प अंमलात आणला गेला तर लाखो प्रवाशांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल घडेल. लोकल ट्रेन भुयारी मार्गाने गेली तर कित्येक एकर जमीन अतिरिक्त वापरासाठी मोकळी होईल.