BEST Bus: गोरेगावातील बेस्टमध्ये मोठा बदल! मिडीबस होणार बंद, प्रवाशांना मिळणार नवीन पर्याय
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
BEST Bus: गोरेगाव-दिंडोशीमधील रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
मुंबई: महानगरी मुंबईच्या वाढत्या लोकसंख्येमुळे, एकेकाळी डोंगराळ वनक्षेत्र असलेलं गोरेगाव आता गजबजलेलं उपनगर बनलं आहे. त्यामुळे पायभूत सुविधांमध्ये देखील बदल होत आहे. मुंबई शहरात प्रवासासाठी सर्वोत्तम पर्याय मानल्या जाणाऱ्या बेस्टने देखील गोरेगावकरांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दिंडोशी-गोरेगावमध्ये आता बेस्टच्या मिडी बसऐवजी मोठ्या बस धावणार आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगाव-दिंडोशीमधील रहिवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत बसच्या फेऱ्या पुरेशा नाहीत. ही बाब लक्षात घेऊन बेस्टने या परिसरासाठी मोठ्या बस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र शासनाच्या स्क्रॅप धोरणामुळे मिडी बस हटवण्यात येणार आहेत. या बसच्या जागी आता 13 नवीन मोठ्या बस गोरेगावच्या रस्त्यांवर धावणार आहेत. यामुळे 346 व 646 (नागरी निवारा), 327 (मंत्री पार्क) या मार्गांवरील प्रवाशांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.
advertisement
दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी दिंडोशी-गोरेगावमध्ये मोठ्या बस चालवण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी सातत्याने पाठपुरावा देखील केला होता. आता त्यांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. मोठ्या बसमध्ये दोन मिडी बसइतके प्रवासी बसू शकतील. त्यामुळे गर्दी आणि रांगा दोन्हीही कमी होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 27, 2025 11:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BEST Bus: गोरेगावातील बेस्टमध्ये मोठा बदल! मिडीबस होणार बंद, प्रवाशांना मिळणार नवीन पर्याय