याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षी नवरात्री आणि कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी तुळजापुरात भाविक दाखल होतात. महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक राज्यातूनही हजारो भाविक दर्शनासाठी येतात. काही भाविक पायी, खासगी वाहनाने तर काही भाविक एसटीबसने तुळजापूरला येतात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 200 बसेस धावणार आहेत. तर 5 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीत तब्बल 1100 बसेस तुळजापूरसाठी धावणार आहेत.
advertisement
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करवीरनगरी दुमदुमली, लाखो भक्त अंबाबाईच्या चरणी
विभागीय वाहतूक अधिकारी अभय देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात विभागस्तरावरून 200 गाड्यांचं नियोजन केलेलं आहे. कर्नाटक राज्य वाहतूक आणि सोलापूर वाहतुकीसाठी इतर विभागातील आणखी 35 बसेस तात्पुरत्या स्वरुपात लागणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 1100 बसेस तुळजापूर येथून धावणार आहे. बस दुरुस्ती आणि तिकीट तपासण्यासाठी पथकं नेमण्यात आली आहेत. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची एसटी महामंडळ काळजी घेणार आहे.
एसटी पार्किंगची व्यवस्था
तुळजापुरात बस पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे. तुळजापूर आगारात कर्नाटक राज्यातील वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण 100 बसच्या पार्किंगची व्यवस्था केली आहे. धाराशिव रोडवरील मुक्तांगण शाळा परिसरात धाराशिव, सोलापूर, बीड, अहिल्यानगर, परभणी विभागातील 225 बस थांबण्याची व्यवस्था असणार आहे. मंगरूळ रोड पार्किंगवर पुणे प्रदेशातील 350 बसेस आणि काक्रंबा बायपास चौकाजवळ लातूर विभागातील 125 बस पार्किंगची सोय करण्यात आली आहे.