Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करवीरनगरी दुमदुमली, लाखो भक्त अंबाबाईच्या चरणी
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Navratri 2025: नवरात्रौत्सवात दररोज देशभरातून लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात.
कोल्हापूर: सोमवारपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. राज्यातील साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरमध्ये देखील मोठ्या उत्साहात घटस्थापना होऊन नवरात्रीला सुरुवात झाली. समोर आलेल्या माहितीनुसार, नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सव्वा लाख भाविकांनी अंबाबाईचं दर्शन घेतलं आहे.
नवरात्रौत्सवात दररोज देशभरातून लाखो भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. सोमवारी घरोघरी घटस्थापना असल्याने दुपारपर्यंत मंदिरात फारशी गर्दी नव्हती. मात्र, दुपारनंतर भाविकांची गर्दी वाढली. स्थानिकांसह विविध राज्यांतील भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी आले होते. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील आकडेवारीनुसार रात्री 8 वाजेपर्यंत 1 लाख 18 हजार 417 भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतलं. त्यानंतरही दर्शन रांगा भरलेल्या होत्या.
advertisement
रात्री साडेनऊ वाजता अंबाबाईची मंदिर परिसरातच पालखी मिरवणूक काढली जाते. परिसरातील फूल व्यावसायिकांकडून रोज वेगवेगळ्या आकारात पालखीची सजावट केली जाते. सोमवारी घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी कलशाच्या आकारात फुलांनी सजवलेली सुवर्ण पालखी काढण्यात आली. भालदार, चोपदार, नेत्रदीपक आतषबाजी, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि अंबाबाईच्या जयघोषात पालखी सोहळा पार पडला. जिल्हाधिकारी अमोल येडगे, देवस्थानचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या उपस्थितीत पालखीचं पूजन झालं. पालखी झाल्यानंतर देखील रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
September 23, 2025 11:45 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी करवीरनगरी दुमदुमली, लाखो भक्त अंबाबाईच्या चरणी