Navratri 2025: महालक्ष्मी पावली! नवरात्रीत या मार्गांवर धावणार बेस्टच्या विशेष बस
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Navratri 2025: नवरात्रीच्याकाळात मुंबईसह आजूबाजूच्या शहरांतून मोठ्या प्रमाणात भक्त महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येतात.
मुंबई: कालपासून (22 सप्टेंबर) शारदीय नवरात्रौत्सवाला सुरुवात झाली आहे. मुंबईत देखील नवरात्रीनिमित्त प्रसिद्ध 'महालक्ष्मी यात्रे'ला सुरुवात झाली आहे. नवरात्रीच्या काळात लाखो भाविक महालक्ष्मीच्या दर्शनासाठी येतात. देवीच्या भक्तांसाठी बेस्टने मोठा निर्णय घेतला आहे. नवरात्रीच्या काळात महालक्ष्मीला जाण्यासाठी बेस्टने विशेष बस सेवा सुरू केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागासह भायखळा, महालक्ष्मी रेल्वेस्टेशन येथून महालक्ष्मी मंदिरा दरम्यान 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरपर्यंत बेस्ट अतिरिक्त गाड्या सोडणार आहे. बेस्टच्यावतीने दररोज 25 अतिरिक्त गाड्या चालणार आहेत. नवरात्रीत मुंबईसह आजूबाजूच्या शहरांतून मोठ्या प्रमाणात भक्त महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी येतात. महालक्ष्मी, भायखळा, दादर, रेल्वे स्टेशनवर उतरून अनेक भक्त महालक्ष्मी मंदिरापर्यंत बेस्टने प्रवास करतात. त्यामुळे मंदिरात जाणाऱ्या भक्तांची गैरसोय होऊ नये व त्यांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी या जादा बस धावणार आहेत.
advertisement
बेस्ट प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महालक्ष्मी यात्रेसाठी येणाऱ्या भक्तांना मार्गदर्शन मिळावे, यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दररोज 25 जादा बस धावणार असून प्रवाशांसाठी प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) येथून महालक्ष्मी मंदिरात जाण्याकरता गर्दीच्यावेळी लालबाग, चिंचपोकळी, सातरस्ता आणि महालक्ष्मी रेल्वे स्टेशन मार्गे विशेष बस उपलब्ध असतील.
advertisement
नवरात्री विशेष बससेवेचे मार्ग
प्रबोधनकार ठाकरे उद्यान (शिवडी) ते महालक्ष्मी मंदिर
ए-37: जे. मेहता मार्ग ते कुर्ला स्टेशन (पश्चिम)
57: वाळकेश्वर ते प्र. ठाकरे उद्यान (शिवडी)
ए-63: भायखळा स्टेशन (पश्चिम) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय
ए-77: भायखळा स्टेशन (पश्चिम) ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय
ए-77: जादा सातरस्ता ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय
83: कुलाबा बसस्थानक ते सांताक्रुझ
advertisement
151: वडाळा आगार ते ब्रीचकॅन्डी रुग्णालय
ए-132 मुंबई सेंट्रल आगार ते ईलेक्ट्रीक हाऊस
ए-357 मुंबई सेंट्रल आगार ते शिवाजीनगर आगार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 23, 2025 10:17 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Navratri 2025: महालक्ष्मी पावली! नवरात्रीत या मार्गांवर धावणार बेस्टच्या विशेष बस