advertisement

Gas Cylinder Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका! घरगुती गॅस सिलिंडर महाग, 60 रुपयांनी वाढले दर

Last Updated:

मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गॅस कंपन्यांनी ही दरवाढ केल्याचं सांगितलं जातंय.

News18
News18
Gas Cylinder Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा पहिला चटका भारतीय गृहिणींच्या किचनला बसला आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर होते. काल रात्री उशिरा अचानक ही दरवाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ थोडी थोडकी नसून 60 रुपयांनी वाढली आहे.
घरगुती सिलिंडरच्या किंमती वाढल्या
घरगुती सिलिंडर थेट ६० रुपयांनी महागला आहे. महागाईच्या या धसक्यामुळे सामान्य माणसाचं महिन्याचं बजेट आता पूर्णपणे कोलमडलं आहे. आज ७ मार्चपासूनच हे नवे दर लागू झाल्याने ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. एप्रिल २०२५ पासून गॅसचे दर स्थिर होते, पण आजच्या या दरवाढीने एका झटक्यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे.
advertisement
कोणत्या शहरात किती रुपयांना मिळणार?
दिल्लीत आता ९१३ रुपये मोजावे लागतील. मुंबई आणि चेन्नईत ही किंमत ९२५ रुपयांच्या पार गेली आहे. कोलकात्यात तर ९३९ रुपयांचा आकडा गाठला आहे. फक्त घरगुतीच नाही, तर कमर्शियल सिलिंडरही ११५ रुपयांनी महागल्याने बाहेरचं जेवणही आता महागणार आहे.
advertisement
हॉटेल व्यावसायिकांना दणका
हॉटेल चालक आता जेवणाच्या थाळीचे दर वाढवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाहेर खाणं देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गॅस कंपन्यांनी ही दरवाढ केल्याचं सांगितलं जातंय.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gas Cylinder Price Hike: इराण-इस्रायल युद्धाचा भारताला फटका! घरगुती गॅस सिलिंडर महाग, 60 रुपयांनी वाढले दर
Next Article
advertisement
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement