TRENDING:

Mumbai Crime News: बापानेच दिला मृत्यूचा 'लाईव्ह' पुरावा! दारावर थापा मारणाऱ्या मुलाला मोबाईलवर काय दिसलं?

Last Updated:

Mumbai Crime News: मुंबईतील धारावी परिसरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीने स्वतःवर 'काळी जादू' केल्याच्या संशयातून एका ५८ वर्षीय पतीने तिची निर्घृण हत्या केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील धारावी परिसरातून एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. आपल्या पत्नीने स्वतःवर 'काळी जादू' केल्याच्या संशयातून एका ५८ वर्षीय पतीने तिची निर्घृण हत्या केली. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर या नराधम पतीने घराबाहेर उभ्या असलेल्या आपल्या मुलाला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल करून आईचा रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह दाखवला. याप्रकरणी धारावी पोलिसांनी आरोपी पतीला बेड्या ठोकल्या असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
"बघ, मी तुझ्या आईला कसं संपवलं!" धारावीत नराधम बापाने मुलाला व्हिडिओ कॉलवर दाखवलं मृत्यूचं लाईव्ह दृश्य
"बघ, मी तुझ्या आईला कसं संपवलं!" धारावीत नराधम बापाने मुलाला व्हिडिओ कॉलवर दाखवलं मृत्यूचं लाईव्ह दृश्य
advertisement

नेमकी घटना काय?

अमृत सोलंकी (वय ५८) आणि सूरजबेन सोलंकी (वय ५२) हे धारावीत राहत होते. त्यांचा मुलगा शिवराम सोलंकी हा मुलुंड परिसरात आपला भंगारचा व्यवसाय करतो. अमृत सोलंकी यांना आपली पत्नी आपल्यावर 'काळी जादू' करते असा संशय होता, ज्यावरून त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. ११ मार्च रोजी जेव्हा शिवराम आई-वडिलांना भेटायला गेला होता, तेव्हा वडिलांनी दारूच्या नशेत "तुझ्या आईला एका दिवशी संपवून टाकीन" अशी धमकी दिली होती.

advertisement

व्हिडिओ कॉलवर दिसला मृत्यूचा थरार

१३ मार्च २०२६ रोजी दुपारी दीडच्या सुमारास शिवराम नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी धारावीत आला होता. स्मशानभूमीत जाण्यापूर्वी तो आई-वडिलांच्या भेटीसाठी घरी पोहोचला. बराच वेळ दरवाजा ठोठावूनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्याने वडिलांना फोन केला. वडिलांनी फोन कट करुन त्याला व्हिडिओ कॉल लावला.

कॉल सुरू होताच शिवराम हादरून गेला. समोर वडिलांच्या डोक्यावर आणि कपड्यांवर रक्ताचे डाग होते. वडिलांनी कॅमेरा फिरवला असता, समोर आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. "मी तिचा गळा दाबून आणि बाटलीने वार करून खून केला आहे," अशी कबुलीही वडिलांनी कॅमेऱ्यासमोर दिली.

advertisement

पोलिसांकडून आरोपीला बेड्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

शिवरामने तात्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला आणि आईला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या भीषण प्रकारानंतर शिवरामने आपल्या वडिलांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली. धारावी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत अमृत सोलंकी यांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Crime News: बापानेच दिला मृत्यूचा 'लाईव्ह' पुरावा! दारावर थापा मारणाऱ्या मुलाला मोबाईलवर काय दिसलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल