करीम लाला हा मायानगरी मुंबईचा पहिला डॉन होता. इतकेच नाही तर त्याने डी कंपनीचा मुख्य दाऊद इब्राहिमला बेक्कार धुतलं होतं. करीम लाला हा दुसरा प्रसिद्ध डॉन हाजी मस्तान याच्याही आधी मुंबईतील गुन्हे विश्वाचा मुख्य होता. करीम लालाचे पूर्ण नाव अब्दुल करीम शेर खान असे होते. करीम लाला हाा मुळचा अफगाणिस्तानचा होता. नोकरीच्या शोधात तो मुंबईत आला आणि इथेच त्याने जुगारीचा सर्वात मोठा अड्डा बनवला. पंतप्रधान इंदिरा गांधी देखील करीम लालाला भेटण्यासाठी मुंबईत यायच्या असा दावा, संजय राऊतांनी केला होता.
advertisement
करीम लालाने सुरू केला मुंबईत सर्वात मोठा जुगारीचा अड्डा
करीम लाला हा वयाच्या 21 व्या वर्षी नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता.त्याने सुरुवातीला अनेक छोट्या मोठ्या ठिकाणी काम केले, परंतु पुरेसे पैसे मिळत नसल्याने त्याने गुन्हेगारीच्या क्षेत्रात आपले पाऊल ठेवले. लालाने ग्रान्ट रोड येथील भाड्याच्या घरात एक जुगारीचा अड्डा सुरू केला परंतु हा अड्डा इतका मोठा होत गेला ही मुंबईतील सर्वात मोठा जुगाराचा अड्डा म्हणून ओळखला जात असे. करीम लालाच्या घरी अनेक प्रसिद्ध व्यक्ती जुगार खेळायला येत होत्या. जुगाराच्या अड्ड्यातून करीम लालाने बक्कळ पैसा कमावला होता.
दाऊदला भर रस्त्यात धुतला
जुगारीच्या धंद्यात यश मिळाल्यानंतर लाला सोनं, हिऱ्याच्या तस्करीच्या धंद्यात शिरला, तिथेही त्यांना आपलं मोठं साम्राज्य निर्माण केले होतो. परंतु ज्यावेळी दाऊदने त्याच्या धंद्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दाऊदला मुंबईच्या रस्त्यावर मारला होता. मुंबईतील गँगस्टरची सख्या वाढल्याने करीम लाला, हाजी मस्तान आणि इतर गँगस्टरनी आपले एरिया वाटून घेतले होते.
करीम लालाचा शेवट कसा झाला?
दरम्यान दाऊद देखील आपला भाऊ शब्बीरसोबत तस्करीचे काम करत होता. करीम लालाचे आणि दाऊदचे शत्रूत्व दिवसेंदिवस वाढत होते.त्यानंतर 1981 साली करीम लालाने गँगने दाऊदचे भाऊ शब्बीरची हत्या केली . या हत्येनंतर दाउद गँग आणि पठाण गँगमध्ये वॉर सुरू झाली. दरम्यान 1986 साली दाऊदच्या साथीदारांनी करीम लालाचा भाऊ रहीम खानची हत्या केली.मात्र दाऊदच्या हाती करीम लाला कधीच लागला नाही. अखेर 2002 साली करीम लालाचे दीर्घ आजाराने निधन झाले