गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आजपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे 3 टप्प्यात अवजड वाहतुकीवर निर्बंध लादण्यात आले आहेत.
गणपतीचे आगमन होत असताना किंवा पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 23 ऑगस्ट 2025च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ते 28 ऑगस्ट 2025च्या रात्री 12 वाजेपर्यंत अवजड वाहतूक सूरू राहणार आहे. 5 व 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होत असताना 31 ऑगस्ट सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे. तसेच 2 सप्टेंबर रोजी देखील सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार आहे.
advertisement
दरम्यान महामार्गावरील अवजड वाहतूक रोखण्यासाठी रत्नागिरी आरटीओची पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच कशेडी घाटापासून ते खारेपाटण पर्यंत आरटीओ विभागाकडून महामार्गावर 24 तास गस्त घालण्यात येणार आहे.
अनंत चतुर्थीच्या गणपतीचे विसर्जन होत असताना 6 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 7 सप्टेंबरच्या रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहतूक बंद राहणार
'या' वाहनांवर बंदी नाही
जयगड बंदर आणि जेएनपीटी बंदर येथून आयात निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, औषध, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्नधान्, भाजीपाला, नाशवंत माल, या जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना हा नियम लागू होणार नाही आहे.