गेली 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी आता नवीन डेडलाईन देण्यात आली आहे. या महामार्गाचे काम येत्या डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शिवेंद्रराजे यांनी आज मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पाहणी करून सद्यस्थितीचा आढावा घेतला. रखडलेल्या कामाची कारणमीमांसा केली. अयोग्य ठेकेदार, भूसंपादनातील अडचणी आणि नैसर्गिक अडथळे यामुळे काम रखडलं ही वस्तुस्थिती आहे. परंतु माणगाव आणि इंदापूर येथील बायपास ची कामे वगळता महामार्गाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होईल, असं शिवेंद्रराजे यांनी सांगितले आहे.
advertisement
बऱ्यापैकी काम झाली आहेत.काही ब्रिजची कामं मागे पडली आहेत.त्यामुळे या ब्रिजच्या ठिकाणी वाहतुकीला अडथळा येण्याची शक्यता आहे.त्यामुळे सर्विस रोड नीट आहेत की नाहीत हे पाहत होता. तसेच इंदांपूर आणि मानगाव मध्ये थाडी अडचण येण्याची शक्यता आहे. त्याच्या कामाचं टेंडर उशिरा आलं, ठेकेदारही काम नीट करत नाही. त्याच्यामुळे वाहतूकीला अडचण येणार आहे. या गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न केला, असे शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
मुंबई गोवा महामार्गाच काम 90-95 टक्के काम पुर्ण होतं आलं आहे.आणि कामच झालं नाही आहे, असा विषय अजिबात नाही आहे.काही ठिकाणी अयोग्य ठेकेदार, भूसंपादनातील अडचणी आणि नैसर्गिक अडथळे यामुळे काम रखडलं ही वस्तुस्थिती आहे.पण या गणपतीसाठी मुंबईतून चाकरमानी कोकणात जातात, ते ट्रॅफीकमध्ये अडकू नये आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा असं आम्हाला वाटत,असे शिवेंद्रराजे भोसले म्हणाले आहेत.
खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. आज मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करताना त्यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला देखील भेट दिली त्यावेळी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.वाहतूक कोंडी आणि अपघात टाळण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.शिवेंद्रराजे भोसले यांनी रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याला भेट देऊन पाहणी केली. बोगद्यात पाण्याची गळती होत असली तरी सध्या कोणताही धोका नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
