TRENDING:

BMC Mayor Election : मुंबई सोडून जाऊ नका, ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश, महापौर निवडणुकीआधी घडामोडींना वेग

Last Updated:

BMC Mayor Election Shiv Sena UBT: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या आगामी महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. या निवडणुका बिनविरोध होणार की चुरस पाहायला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने (UBT) मोठी खेळी खेळण्याचे संकेत दिले आहेत. महापौरपदासाठी निवडणूक लढवण्याबाबत आज मातोश्रीवर अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
मुंबई सोडून जाऊ नका, ठाकरेंचे आदेश, महापौर निवडणुकीआधी घडामोडींना वेग
मुंबई सोडून जाऊ नका, ठाकरेंचे आदेश, महापौर निवडणुकीआधी घडामोडींना वेग
advertisement

मातोश्रीवर खलबतं, निवडणूक लढवण्यावर शिक्कामोर्तब होणार?

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचे प्रमुख नेते, पालिकेतील गटनेते आणि ज्येष्ठ नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महापौर आणि उपमहापौर पदासाठी उमेदवार उभा करायचा की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षातील बहुतांश नेत्यांचे मत निवडणूक लढवण्याच्या बाजूने आहे, जेणेकरून सत्ताधारी गटासमोर तगडे आव्हान उभे करता येईल.

advertisement

८ फेब्रुवारीपर्यंत मुंबईत राहण्याचे आदेश

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीचे राजकारण टाळण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक पाऊल उचलले आहे. पक्षाच्या सर्व नगरसेवकांना ८ फेब्रुवारीपर्यंत मुंबई बाहेर न जाण्याचे कडक आदेश देण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेच्या महापौर, उपमहापौर निवडणुकीत ठाकरे गट आणि मनसे यांची रणनीती काय असणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
बदलापूरचा नवसाला पावणारा बाप्पा, थेट शिवकाळाशी कनेक्शन अन् पेशव्यांचं दान, Video
सर्व पहा

दरम्यान, संख्याबळाचा विचार करता, भाजप-शिवसेना शिंदे गटाकडे ११८ नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या तीन नगरसेवकांचा पाठिंबा मिळाल्यास त्यांची संख्या १२१ वर जाणार आहे. तर, दुसरीकडे विरोधी बाकांवरील एकूण संख्याबळ हे १०० हून अधिक आहे. यामध्ये ठाकरे गट ६५, मनसे ६, काँग्रेस २४, एमआयएम ८, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट १, समाजवादी पार्टी २ आदी संख्याबळ आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC Mayor Election : मुंबई सोडून जाऊ नका, ठाकरेंचे नगरसेवकांना आदेश, महापौर निवडणुकीआधी घडामोडींना वेग
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल