>> ठाकरे गटाचे आक्षेप काय?
आदिवासी प्रवर्ग (ST) का वगळला? किशोरी पेडणेकर यांनी सर्वात मोठा प्रश्न 'एसटी' प्रवर्गाबाबत विचारला. "मुंबई महापालिकेत अनुसूचित जमातीचे (ST) दोन नगरसेवक निवडून आले आहेत. मग आरक्षणाची चिठ्ठी काढताना हा प्रवर्ग का वगळण्यात आला? महायुतीकडे या प्रवर्गाचे नगरसेवक नाहीत म्हणून हा जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. जाणीवपूर्वक आदिवासी प्रवर्गाला वगळण्यात आले. अचानकपणे आदिवासी प्रवर्गासाठी किमान तीन जागांचा नियम केला असल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. सत्ताधाऱ्यांना मिळालेल्या जागांच्या आधारेच लॉटरी काढण्यात आल्याचा आरोप पेडणेकर यांनी केला.
advertisement
मुंबईचे महापौरपद इतर मागास प्रवर्गासाठी (OBC) का आरक्षित केले नाही, यावरही ठाकरे गटाने आक्षेप घेतला. लोकसंख्येच्या प्रमाणात आणि चक्राकार पद्धतीनुसार ओबीसींना संधी मिळायला हवी होती, असा दावा त्यांनी केला. महिला ओबीसींसाठी हे पद असायला हवे होते.
"मागील महापौर पद सर्वसाधारण (Open) गटासाठी होते, मग यंदाही ते तसेच का ठेवले नाही? रोटेशनच्या नावाखाली सोयीचे राजकारण केले जात आहे," असे पेडणेकर यावेळी म्हणाल्या. भाजप प्रतिनिधी आणि किशोरी पेडणेकर यांच्यात वादावादी झाली. या वेळी तुमचे आक्षेप नोंदवण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
इतर संंबंंधित बातमी:
२९ महापालिकांचे 'कारभारी' ठरले! महापौरपदाचे आरक्षण जाहीर; पाहा तुमच्या शहरात कोणाची वर्णी?
