मंगळवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे वाशीला जाणारी 9:06 वाजताची लोकल ट्रेन 23 मिनिटांसाठी थांबवण्यात आली. रेल्वेच्या छतावर एक भटका श्वान धावताना दिसला. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताना दिसतोय.
जेव्हा ट्रेन 9:05 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून निघण्याच्या तयारीत होती, तेव्हा काही लोकांना शेवटच्या क्षणी श्वान ट्रेनच्या वर दिसला. सरकारी रेल्वे पोलिस (जीआरपी) कर्मचाऱ्यांनी त्याला हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. परंतु गोंधळलेला आणि घाबरलेला प्राणी ट्रेनच्या दुसऱ्या टोकाकडे पळून गेला.
advertisement
दरम्यान, श्वान पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना तो अनवधानाने वरच्या विजेच्या तारांच्या संपर्कात आला आणि त्याला विजेचा धक्का बसला. सूत्रांकडून असं दिसून आलं की, श्वान सीएसएमटीच्या वाशी टोकावरील फूट ओव्हरब्रिजवरून ट्रेनमध्ये चढला असावा. ही घटना नेमकी कशी घडली? हे निश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.