TRENDING:

पुण्याहून मुंबईकडे निघाला असाल तर थांबा, अजूनही एक्सप्रेस वेवर कोंडी, वाहतूक कधी सुरू होणार? मोठी अपडेट

Last Updated:

द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्त गॅस टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर गेल्या २४ तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. एक्सप्रेसवेवरील आडोशी बोगदा परिसरात गॅस टँकर उलटून सुमारे २७ तास झाले असले, तरी अद्याप वाहतूक सुरळीत झालेली नाही. या अपघातामुळे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, हजारो प्रवासी तासनतास रस्त्यावर अडकून पडले आहेत.
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वाहतूक कोंडी
advertisement

द्रुतगती मार्गावरील अपघातग्रस्त गॅस टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये भरण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किमान दोन टँकर गॅसने भरले जाणार आहेत.

वाहतूक कधी सुरू होणार? मोठी अपडेट

त्यानंतर अपघातग्रस्त टँकर रस्त्याच्या बाजूला करण्याची प्रक्रिया राबवली जाणार असून, वाहतूक सुरळीत होण्यासाठी अजून किमान चार तास लागणार आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, गॅस गळती होत असलेल्या टँकरचे तापमान वाढू नये यासाठी सतत पाण्याचा मारा केला जात आहे. एकूणच द्रुतगती मार्गावरील वाहतूक पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी अजून किमान चार तासांचा कालावधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

advertisement

तो टँकर कुठून कुठे चालला होता?

प्रोपोलिन गॅस घेऊन जाणाऱ्या टँकर हा वीस टन वजनाचा आहे. तो कोचीवरून आलेला आणि गुजरातला जात असताना मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्या जवळ कलंडला. आता दोन टँकरमध्ये गॅस भरण्यात आला असून अशा एकूण चार टँकरमध्ये तो भरला जाणार आहे. आतापर्यंत दोन टँकरमध्ये गॅस भरण्यात आला आहे. महामार्ग पोलिस, हेल्प फाउंडेशन, स्थानिक प्रशासन मदतीला आहेत.

advertisement

प्रवाशांना मनस्ताप, पुणे-मुंबई अनेक एसटी गाड्या रद्द

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
AC चं बिल येईल शुन्य रुपये! 3-4 अंशावर रूम होईल गार, किंमत ऐकून बसेल शॉक!
सर्व पहा

या वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. काहींना विमानतळावर पोहोचायचे आहे. काहींना दवाखान्यामध्ये ट्रिटमेंट घेण्यासाठी पोहोचायचे आहे. तर काहींना आपला माल मुंबई विमानतळावर पोहोचवायचा आहे. मात्र या सर्वांना वाहतूक कोंडीचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. असे असताना पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मुंबई सेंट्रल, दादर, ठाणे, बोरीवलीकडे जाणाऱ्या सर्व एसटी बसेसच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पुढील काही तासासाठी बसेस फेऱ्या बंद राहणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिलेल्या आहेत. वाहतूक सुरळीत झाल्यानंतर पुढचा निर्णय कळवला जाईल, असे एसटी प्रशासनाने सांगितले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुण्याहून मुंबईकडे निघाला असाल तर थांबा, अजूनही एक्सप्रेस वेवर कोंडी, वाहतूक कधी सुरू होणार? मोठी अपडेट
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल