दिवा शहर ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येत असून दिव्याची लोकसंख्या पाच लाखाच्यावर आहे. सुरक्षेच्या कारणास्तव येथे मुंब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत दिवा चौकी असून सदर पोलीस स्टेशनला पंचवीस ते तीस लोकांचा अपुरा असा स्टाफ असल्यामुळे दिव्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढलं आहे. चरस, गांजा, हकीम यासारख्या व्यसनाला येथील तरुण मंडळी आधीन जाताना दिसत आहेत. महिलांच्या तक्रारी सुद्धा भरपूर प्रमाणात आहेत. चोरी, दरोडे यासारखे प्रकार दिव्यात सरसपणे होताना दिसत आहेत. पंचवीस हजार लोकसंख्येच्या मागे एक पोलीस अशी दैन्य अवस्था दिवा चौकीचे आहे.
advertisement
त्यामुळे दिव्यातील लोकांना FRI करायची असल्यास त्यांना दहा किलोमीटर मुंब्रा पोलीस स्टेशन येथे जावे लागतं. त्यामुळे येथील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दिवावासी गेले कित्येक वर्ष दिवा पोलीस स्टेशन व्हावे म्हणून आम्ही वारंवार मागणी नागरिक करत आहेत. यायची दखल घेत पोलीस स्टेशन व्हावे म्हणून मनसे नेते राजू पाटील हें पाठपुरावा करत आहे. मनसे नेते राजू पाटील नुकतीचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेतली असून यावेळी पत्र देत दिवा शहारासाठी नवीन पोलीस स्थानक तयार करावे अशी मागणी केली. यावेळी शिवसेनेचे माजी आमदार सुभाष भोईर उपस्थिती होते.
काय हवं वेगळं पोलीस स्टेशन?
ठाणे महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या दिवा शहर आणि परिसरातील गावांमधील लोकसंख्या पाच लाखापेक्षा जास्त असून हा संपूर्ण परिसर मुंब्रा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो.मुंब्रा पोलीस स्टेशनवर आधीच भार असल्यामुळे दिवा व परिसरासाठी केवळ २० ते २५ पोलीस कर्मचारी मिळत आहेत. त्यामुळे शहरामध्ये खून, चोऱ्या, दरोडे, विनयभंग, फसवणूक सारख्या वाढत असलेल्या गुन्ह्यावर आळा घालणे कठीण होत आहे. याकरिता मुंब्रा पोलीस ठाण्याचे विभाजन करुन दिवा शहर आणि परिसरासाठी स्वतंत्र पोलीस ठाण्याची निर्मिती करावी अशी मागणी करण्यात आली होती. या संदर्भात पोलीस आयुक्तालय, ठाणे शहर यांनी ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अधिपत्याखालील मुंब्रा पोलीस ठाण्याचे विभाजन करुन दिवा येथे नवीन पोलीस ठाणे निर्माण करणेबाबतचा प्रस्ताव शासनास सादर केलेला असून सदरचा प्रस्ताव शासन स्तरावर अद्याप प्रलंबित आहे तसंच नियोजित दिवा पोलीस ठाणे करिता भूखंड आणि समंतीपत्रक मिळणेकरिता मा.जिल्हाधिकारी तसंच महानगरपालिका यांच्याशीही पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. तरी दिवा शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने मुंब्रा पोलीस ठाण्याचे विभाजन करुन दिवा शहरासाठी नवीन पोलीस स्थानक निर्मिती करणेबाबतचा प्रस्ताव मागवून तातडीने मान्यात देण्यात यावी, अशी विनंती राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.